spot_img
अहमदनगररामनवमीच्या मिरवणुकीत हिंसाचार! जाळपोळ अन् दगडफेक, कुठे घडाला प्रकार?

रामनवमीच्या मिरवणुकीत हिंसाचार! जाळपोळ अन् दगडफेक, कुठे घडाला प्रकार?

spot_img

नवी दिल्ली | वृत्तसंस्था
रामनवमी संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरी झाली. परंतु, पश्चिम बंगालमध्ये काढण्यात आलेल्या मिरवणुकीला गाबोट लागले आहे. दोन ठिकाणी हिंसाचार झाला असून दोन गटात हाणामारी झाली आहे. या घटनेत १८ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे पसिसरात तणावाचे वातावरण आहे.

सविस्तर असे की, पश्चिम बंलामध्ये रामनवमी निमित्त मिरवणूक काढण्यात आली. मेदिनीपूरच्या इग्रा येथे देखील दोन गटांमध्ये मारामारी झाली. या संदर्भातील अनेक बातम्या आणि जाळपोळ झाल्याचे व्हिडिओ तसेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हिंसाचारात आतापर्यंत १८ व्यक्ती जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींमध्ये दोन अल्पवयीन मुलं, महिला, पोलिस कर्मचारीही गंभीर जखमी झाले आहेत.

मिरवणुक सुरू असताना अचानक दोन गट एकमेंकांना भीडले. जाळपोळ तसेच मोठ्या प्रमाणावर दगडफेक करण्यात आली. रॅलीमध्ये तणाव वाढत असल्याचे पाहून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जमावाला पांगवण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. जखमींना बहारमपूर येथील मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये गटशिक्षणधिकारी कार्यालयाचे कारनामे उजेडात!

शिक्षकांकडून गंभीर तक्रारी | गटशिक्षणाधिकार्‍यांवर कारवाईसाठी शिक्षक संघटना सरसावल्या अहिल्यानगर । नगर सहयाद्री भ्रष्टाचार, आर्थिक...

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : तीन टप्प्यात मतदान, पुढील आठवड्यात घोषणा

दुसर्‍या टप्प्यात झेडपी, पंचायत समिती, महापालिका निवडणूक शेवटच्या टप्प्यात मुंबई | नगर सह्याद्री प्रभाग रचना, इतर...

‘तुम्ही डिजिटल अरेस्ट झालात!, सावेडीतील इंजिनीअला ९ लाखाला गंडवले, वाचा नगर क्राईम

अहिल्यानगर |  नगर सहयाद्री मुंबई सायबर सेलच्या नावाने व्हीडीओ कॉल करून, ‘अवैध पार्सल’चा बनाव...

हे घ्या पुरावा! राज ठाकरेंनी आकडे नाही तर मतदार याद्यांचा ठीग दाखवला…, कोण काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री - मतदार याद्यांमधील घोळ आणि कथित मतचोरीच्या आरोपासंदर्भात निडणूक आयोगाला...