spot_img
अहमदनगरपारनेरकरांचा कला केंद्रातील 'छम्म छमला' विरोध; ग्रामस्थ आक्रमक; नेमकं काय घडलं?

पारनेरकरांचा कला केंद्रातील ‘छम्म छमला’ विरोध; ग्रामस्थ आक्रमक; नेमकं काय घडलं?

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री:-
नगर-कल्याण महामार्गावरील पारनेर-जुन्नर हद्दीवर गट नंबर ३४० मध्ये पेमदरा ग्रामपंचायत अंतर्गत प्रस्तावित कला केंद्राला सावरगाव, काळेवाडी आणि परिसरातील १०-१२ गावांतील ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

यासंदर्भात लवकरच ग्रामसभा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उद्योजक शिवाजी बेलकर, ज्येष्ठ नेते गंगाराम बेलकर, सरपंच नंदा शिंदे, देवराम मगर, सचिन गोडसे, रवींद्र गायखे, प्रदीप गुगळे, शिवाजी भोसले, प्रकाश चिकणे, संतोष गायखे, सुनील तांबोळी, आकाश गुगळे, नवनाथ राळे, रणधीर शिंदे, निलेश चिकणे, रामदास साळवे, बाळासाहेब शिरतार प्रथमेश साळवे, ऋषिकेश कळमकर आणि हरिभाऊ साळवे यांनी दिली. समाजमाध्यमांवरही ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, पेमदरा सरपंच आणि सदस्यांना यासंदर्भात जाब विचारण्याची तयारी सुरू आहे. म्हसोबा झापचे सरपंच प्रकाश गाजरे यांनी सुद्धा या कला केंद्र संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

पारनेर तालुक्यातील सावरगाव, नांदुर पठार, कर्जुले हर्या, म्हसोबा झाप, पोखरी, पळसपुर आणि जुन्नर तालुक्यातील आणे, नळावणे या ग्रामपंचायतींनी कला केंद्राविरोधात लेखी ठराव घेण्याचा निर्णय घेतला आहे. बाजार समितीचे माजी संचालक शिवाजी बेलकर आणि सचिन गोडसे यांनी याबाबत माहिती दिली. तसेच, निलेश लंके प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रविंद्र राजदेव यांनी कला केंद्राचे काम तातडीने थांबवण्याची मागणी केली आहे. अन्यथा रास्ता रोको आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.

प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, कला केंद्रामुळे परिसरातील नागरिकांचे मोठे नुकसान होईल, अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतील आणि शांतता भंग होईल. हा परिसर गुन्हेगारांचा अड्डा बनण्याची भीती आहे. कला केंद्रापासून तीन किलोमीटर अंतरावर श्री रंगदास स्वामी, खंडोबा, हनुमान, हरेश्वर आणि ढोकेश्वर देवस्थाने आहेत. तसेच, शाळा, तंत्रज्ञान आणि वैद्यकीय महाविद्यालये असलेल्या या भागात युवकांचे भवितव्य धोक्यात येऊ शकते. त्यामुळे कला केंद्र त्वरित बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

अध्यात्मिक परंपरा नष्ट होईल
पारनेर जुन्नर हद्दीवर पेमदारा परिसरात जर कला केंद्र सुरू झाले तर या भागातील ४० पेक्षा जास्त गावांमधील युवक बेरोजगार होऊन व्यसनाधीन होतील व त्यामुळे अनेकांचे संसार सुद्धा उध्वस्त होतील आणि परिसरात असलेली एक अध्यात्मिक सांस्कृतिक परंपरा सुद्धा नष्ट होऊन शांतता भंग होईल.
-उद्योजक संतोष गायखे (सावरगाव ग्रामस्थ)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महाराष्ट्रात मोठे मंत्री हनी ट्रॅपमध्ये, सभागृहात पटोलेंचा पेनड्राईव्ह बॉम्ब

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या हनी ट्रॅप प्रकरणाने विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात...

भयंकर! शॉपिंग मॉलला भीषण आग, 60 जणांचा मृत्यू; अनेक जण जिवंत जळाले

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - इराकमध्ये शॉपिंग मॉलला भीषण आग लागली. या आगीमध्ये लहान...

संदीप थोरात आणखी गोत्यात; ठेवीदारांचा आक्रमक पवित्रा, पत्रकार परिषदेत मोठी माहिती उजेडात

अहिल्यानगर | नगर सह्याद्री क्लासिक ब्रीज, मनीमॅक्सच्या माध्यमातून अनेकांना गंडा घातल्यानंतर सह्याद्री मल्टीसिटी निधी लि....

डांगे आयुक्त आहेत की भ्रष्टाचाऱ्यांचे प्रवक्ते?; किरण काळे यांचा सवाल

अहिल्यानगर | नगर सह्याद्री मनपातील 776 रस्त्यांच्या कामात झालेल्या सुमारे 350 ते 400 कोटींच्या महाघोटाळ्याच्या...