spot_img
ब्रेकिंगगाव हादरलं! कुटुंबावर हल्ला, घरावर दगडफेक, दागिणे लुटले, वाचा सविस्तर

गाव हादरलं! कुटुंबावर हल्ला, घरावर दगडफेक, दागिणे लुटले, वाचा सविस्तर

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री
व्यवसायाची टीप पोलिसांना दिल्याच्या संशयावरुन अहिल्यानगर तालुक्यातील जेऊर (बायजाबाई) येथे आठ जणांनी मिळून एका कुटुंबावर हल्ला करत मारहाण, लूट आणि धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली. फिर्यादी आवईज सलाम कुरेशी (वय २१, रा. जेऊर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी मुनाफ चांद शेख, इखलास मुनाफ शेख, इमरान चांद शेख, मुजफ्फर चांद शेख, मुजाहिद हबीब शेख, सरफराज हबीब शेख, साहिल जलील शेख आणि अदिल जलील शेख (सर्व रा. जेऊर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. घटना २५ जून २०२५ रोजी सकाळी ५ वाजता घडली. फिर्यादीनुसार, मुनाफ आणि इखलास यांनी आवईज यांचा भाऊ समशेर याला तुम्ही आमच्या व्यवसायाची टिप पोलिसांना दिली असा आरोप करत मारहाण केली. त्यानंतर आठही आरोपी लाकडी दांडके, लोखंडी रॉड, फायटर आणि दगड घेऊन आवईज यांच्या घरात घुसले.

त्यांनी आवईज, त्यांची आई नाझीया आणि आजी शायदा यांना शिवीगाळ करत मारहाण केली. मुजफ्फरने आवईज यांच्या डोयावर दांडयाने, साहिलने पाठीवर फायटरने आणि अदिलने पायावर रॉडने वार केले. नाझीयाला सरफराज, मुनाफ आणि इखलास यांनी मारहाण करत लज्जास्पद वर्तन केले आणि तिचे दीड तोळ्याचे मंगळसूत्र व अर्धा तोळ्याचे टॉप लुटले. आरोपींनी घरावर दगडफेक करत मोहल्ल्यात राहू देणार नाही अशी धमकी दिली. जखमींवर सिव्हील हॉस्पिटल, अहिल्यानगर येथे उपचार करण्यात आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर ब्रेकिंग! कामरगाव शिवारात बिबट्या ठार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर–पुणे महामार्गावरिल कामरगाव शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत नर जातीचा बिबट्या...

रेडबुल वाटून विकास होत नाही, तालुक्याची कामधेनू असलेला कारखाना विक्री करण्याची वेळ कोणी आणली?; पारनेर मध्ये मंत्री विखे पाटील कुणावर बरसले?

पारनेर । नगर सहयाद्री जाणत्या राजांनी जिल्हा दुष्काळमुक्त करण्याच्या फक्त वल्गना केल्या, मात्र प्रत्यक्षात निधी...

महाराष्ट्रात गारठा वाढला, ‘या’ जिल्ह्यात कडाक्याची थंडी, वाचा हवामान खात्याचा अंदाज

मुंबई । नगर सहयाद्री:- उत्तरेकडील थंड वारे राज्याच्या दिशेने वाहू लागल्याने गारठा वाढला आहे....

आजचे राशी भविष्य ! ‘या’ राशींच्या नशिबात दडलंय काय? वाचा सविस्तर

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य दिवसाच्या सुरवातीत तुम्हाला आज आर्थिक हानी होऊ शकते...