spot_img
अहमदनगरग्रामपंचायत शिपायांचा पाण्यात बुडून मृत्यू? नेमकं काय घडलं..

ग्रामपंचायत शिपायांचा पाण्यात बुडून मृत्यू? नेमकं काय घडलं..

spot_img

जामखेड । नगर सहयाद्री
जामखेड तालुक्यातील पिंपळगाव आवळा येथील ग्रामपंचायत शिपाई असलेले बापू विश्वनाथ खवळे (वय ४१) हे गावाच्या पाणीपुरवठ्याची मोटार चालू करण्याकरिता गेले असता त्यांचा तलावाच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेमुळे जामखेड तालुक्यात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत सविस्तर असे की, मयत बापु विश्वनाथ खवळे हे पिंपळगाव आळवा ग्रामपंचायमध्ये शिपाई म्हणुन काम करत होते. काल दि.१२ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ८च्या सुमारास ग्रामपंचायतची पाणी पुरवठा करणारी इलेक्ट्रीक मोटार चालु करण्यासाठी ते घोडेगाव तलावावर गेले होते.

परंतु ते लवकर घरी परत न आल्यामुळे १० वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा सागर हा वडील घरी आले नाही म्हणुन त्यांना पाहायला घोडेगाव तलावावर गेला होता. त्यावेळी त्याला बापु खवळे यांचे कपडे पाण्याच्या कडेला दिसल्याने त्याने त्याच्या मित्रांना बोलावुन त्यांचा पाण्यामध्ये शोध घेतला असता मयत बापू खवळे हे जिथून गावाला पाणीपुरवठा होतो त्या विहीरीपाशी बेशुध्द अवस्थेत पडले होते. या घटनेची माहिती मिळताच गावातील सरपंच बाबासाहेब मोहिते, भारत साठे, ज्ञानेश्वर ढवळे, बाळू खवळे, सागर खवळे आदि नागरिकांनी सदर तलावाकडे धाव घेऊन बापू खवळे यांना बाहेर काढले.

यानंतर बापु खवळे यांना खाजगी वाहनाने ग्रामीण रुग्णालय जामखेड येथे उपचाराकरिता घेवुन गेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांची तपासणी ते मयत झाल्याचे घोषित केले. या घटनेतील मयत बापू विश्वनाथ खवळे यांचे मेव्हणे भाऊसाहेब पौडमल यांनी दिलेल्या खबरीवरून त्यानुसार खर्डा पोलीस स्टेशनला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ प्रमाणे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास खर्डा पोलीस करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महाविकास आघाडीला धक्का; ‘ती’ याचिका फेटाळली

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या प्रकरणात महाविकास आघाडीला गुरुवारी धक्का...

…’ते’ वादाच्या दिशेने जात आहेत; मनोज जरांगेंची धनंजय मुंडेंवर टीका

Manoj Jarange Patil: चिल्लर चाळे करायला लागल्याने धनंजय मुंडे हे जातीय वादाच्या दिशेने जात...

कव्वाली वाजवणाऱ्यांचा कार्यक्रम लागला; आमदार संग्राम जगताप यांनी घेतला विरोधकांचा समाचार

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- नगरच्या इतिहासात गणपती विसर्जन मिरवणुकीत आत्तापर्यंत कधीच कव्वाली वाजविली गेली नाही....

राज्यात पुन्हा वाढणार हुडहुडी! येत्या तीन दिवसांत अवकाळी पावसाचा इशारा

मुंबई | नगर सह्याद्री:- उत्तरेकडील राज्यांमध्ये वाढलेल्या थंडीच्या लाटेचा परिणाम देशभरात होत असल्याचे पाहायला मिळत...