Crime News : एक संतापजनक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील गावगुंडांनी एका विवाहितेचा विनयभंग करत भर रस्त्यात तिला नग्न करण्याचा प्रयत्न केला. यावेळी, तिच्या पतीने मदतीसाठी धाव घेतली असता त्यालाही बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
पीडित महिलेला त्रास देणाऱ्या गुंडांनी तिच्या पतीकडे “या भागात राहायचे असेल, तर तुझी बायको आमच्याकडे पाठव” अशी संतापजनक मागणी केली. रस्त्यावरच तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाला, पण पोलिसांनी फक्त एनसी दाखल करून प्रकरण मिटवण्याचा सल्ला दिला.
त्यामुळे कल्याण टिटवाळा भागातील स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पीडित कुटुंबाने न्याय मिळावा म्हणून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली.