spot_img
अहमदनगरविखे पाटलांनी शब्द पाळला! साकळाई योजनेचा मार्ग मोकळा; लाभधारक शेतकर्‍यांमध्ये आनंदोत्सव

विखे पाटलांनी शब्द पाळला! साकळाई योजनेचा मार्ग मोकळा; लाभधारक शेतकर्‍यांमध्ये आनंदोत्सव

spot_img

घोड प्रकल्पाच्या फेर जल नियोजनास शासनाची मंजुरी
सुनील चोभे / नगर सह्याद्री
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मौजे चिंचणी येथील घोड धरणाच्या फेर जल नियोजनास राज्याच्या जलसंपदा विभागाने शुक्रवारी (दि.21 मार्च) मंजुरी दिली असून या फेर जल नियोजनात प्रस्तावित साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे साकळाई योजनेचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशानुसार याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. दरम्यान साकळाई योजनेचा मार्ग मोकळा झाला असल्याने लाभधारक शेतकऱ्यांमध्ये आनंदोत्सव साजरा केला.

घोड प्रकल्पाच्या मूळ प्रकल्प अहवालानुसार प्रकल्पाची एकुण साठवण क्षमता 216.30 द.ल.घ.मी (7.63 अ.घ.फु.) असून प्रकल्पाचा उपयुक्त पाणीसाठा 154.80 द.ल.घ.मी. (5.46 अ.घ.फु.) एवढा आहे. मंजूर प्रकल्प अहवालानुसार प्रकल्पाचा सिंचनाचा पाणीवापर 10 अ.घ.फु. एवढा आहे. कृष्णा पाणी तंटा लवादाचे अनुषंगाने केंद्रीय जल आयोगास सादर केलेल्यानुसार घोड प्रकल्पासाठीची वार्षिक पाणी वापराची तरतूद ही 10.40 अ. घ. फू. इतकी आहे.
महामंडळाने सादर केल्याप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा व नगर तालुक्यातील 32 गावातील ल.पा तलाव, को.प. बंधारे, साठवण बंधारे भरून सिंचनासाठी व पिण्यासाठी पाणी उपलब्ध करुन देण्याबाबत शेतकरी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांची मागणी आहे. त्यामुळे वरील मागणीनुसार सदर क्षेत्रासाठी घोड प्रकल्पांतर्गत धरणाच्या उत्तर-पूर्व दिशेला असणाऱ्या अवर्षण ग्रस्त प्रदेशातील सिंचनासाठी व पिण्यासाठी साकळाई उपसा सिंचन योजना प्रस्तावित आहे.
घोड प्रकल्पाचा सन 2009-2021 या कालावधीतील घोड प्रकल्पाचा वार्षिक महत्तम पाणीवापर 7.98 अ.घ.फु. इतका असुन नियोजित वार्षिक पाणीवापरापेक्षा (10.40-7.98) 2.42 अ.घ.फु. ने कमी आहे. साकळाई उपसा सिंचन योजनेअंतर्गत 12000 हेक्टर क्षेत्रास सिंचनासाठी 1.6 अ.घ.फु. पाणी व पिण्यासाठी 0.2 अ.घ.फु. पाणी अशाप्रकारे एकूण 1.8 अ.घ.फु. पाणी घोड धरणातून प्रस्तावित करण्यात आले आहे. अशाप्रकारे घोड प्रकल्पाचा आज अखेर महत्तम वार्षिक पाणीवापर व प्रस्तावित साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी आवश्यक पाण्याची गरज लक्षात घेता सदर पाणी घोड प्रकल्पाचे अस्तिवातील वार्षिक पाणीवापराच्या तरतुदीतून भागवणे शक्य असल्याचे महामंडळाने म्हटले आहे.

या गावांना होणार फायदा
साकळाई योजनेमुळे श्रीगोंदा आणि नगर तालुक्यातील चिखली, कोरेगाव, घोसपुरी, सारोळा कासार, खडकी, जाधववाडी, वाळकी, शिराढोण, हिवरे झरे, बाबुर्डी बेंद, दहिगाव, साकत, वाटेफळ, देऊळगाव सिद्धी, तांदळी, वडगाव, रुईछत्तसी, आंबिलवाडी, गुणवडी, गुंडेगाव, राळेगण, मांडवगण, मठपिंप्री, हातवळण, खांडगाव, महांडूळवाडी, कोळगाव, सुरेगाव, घुटेवाडी, कोतुळ, बांगर्डा, कामठी, खांडगाव या जिरायती गावांमधील तब्बल 12 हजार हेक्टर क्षेत्र 1.8 टीएमसी पाण्यामुळे ओलिताखाली येणार आहे.

विखे पिता-पुत्रांच्या पाठपुराव्याला यश
2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी अहमदनगर लोकसभा मतदासंघातील भाजपाचे तत्कालिन उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ वाळकी येथे झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साकळाई योजनेचा शब्द दिला होता. परंतु, त्यानंतर राज्यात सत्ता परिवर्तन झाले व साकळाई योजनेचा प्रश्न मागे पडला. त्यानंतर पुन्हा युतेीचे सरकार आल्यानंतर युती सरकारच्या काळात माजी खासदार सुजय विखे पाटील व मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साकळाई योजनेसाठी आवश्यक असणारे पाणी उपलब्ध असल्याचे दाखवून दिले. व साकळाई योजनेसाठी मंत्रालय स्तरावर बैठका घेतल्या. आता राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. तसेच राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा खात्याचे मंत्री आहेत. सरकारमध्ये जलसंपदा मंत्रीपदाची जबाबदारी खांद्यावर पडताच मंत्री विखे पाटील यांनी साकळाई योजना माग लावणार असल्याचे आश्वासन दिले होते. 21 मार्च रोजी साकळाई योजनेचा मार्ग मोकळा झाल्याने शेतकऱ्यांमधून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी साकळाईचा शब्द पाळला असल्याचे लाभधारक शेतकऱ्यांकमधून बोलले जात आहे.

कृती समितीने उभारला लढा
गेल्या 30-40 वर्षांपासून साकळाई योजनेचा प्रस्ताव धूळ खात पडला होता. दरम्यान साकळाई योजना माग लागावी यासाठी साकळाई कृती समितीच्यावतीने लढा उभारण्यात आला. वेळोवेळी आंदोलने, रास्तारोको करण्यात आले. शासन दरबारी पाठपुरावा केला.दरम्यान विधानसभेच्या निवडणुका होऊन राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाले. तसेच जलसंपदा खाते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकड सोपविण्यात आले. कृती समितीच्यावतीने वारंवार साकळाई योजनेचा जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला. नुकतीच कृती समितीच्यावतीने मंत्री विखे पाटलांची भेट घेतली होती. त्यावेळीही लवकरच साकळाई योजनेचा प्रश्न माग लागेल असे आश्वासन दिले होते. दरम्यान या योजनेसाठी आमदार शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार बबनराव पाचपुते यांनीही पाठपुरावा केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

हवामान विभागाची खुशखबर!, शेतकऱ्यांसाठी यंदाचा मान्सून कसा?, वाचा सविस्तर

Monsoon Update: देशात जून ते सप्टेंबर या काळात सर्वसामान्यांपेक्षा अधिक पावसाची शक्यता असून, संपूर्ण...

बापरे! २१ गोण्या ड्रग्स पावडर पकडली; ‘ नोकरी सोडून तरुणाचा एमआयडीसी…’

Ahilyanagar Crime: येथील एमआयडीसीमधील एका गोदामातून 21 गोण्या पांढर्‍या रंगाची पावडर व खडे घेवून...

आजचे राशी भविष्य ! यशस्वी होण्यासाठी आजचा दिवस छान..

मुंबई । नगर सह्याद्री– मेष राशी भविष्य आज तुम्ही एकदम शांततेत राहाल आणि मौजमजा करण्याचा तुमचा...

कुकडीचे आवर्तन तातडीने सोडा; कोणी केली मागणी पहा…

माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र म्हस्के यांचे उपोषण सुरू श्रीगोंदा | नगर सह्याद्री कुकडीच्या सल्लागार समितीची...