spot_img
ब्रेकिंगसंयमाने परिस्थिती हाताळत, अभूतपूर्व पेचातून मार्ग काढत कसोटीस उतरलेले संयमी नेतृत्व विखे...

संयमाने परिस्थिती हाताळत, अभूतपूर्व पेचातून मार्ग काढत कसोटीस उतरलेले संयमी नेतृत्व विखे पाटील खरेखुरे वास्तववादी संकटमोचक!

spot_img

सारिपाट / शिवाजी शिर्के

काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या राळेगणसिद्धी येथील उपोषणात गिरीष महाजन यांनी अण्णांची मनधरणी केली आणि अण्णांनी उपोषण सोडले. त्यावेळी गिरीषभाऊ हे तत्कालीन फडणवीस सरकारसाठी संकटमोचक ठरल्याची चर्चा झडली. याशिवाय अण्णांसोबत त्या आंदोलना दरम्यान जी चर्चा व्हायची ती बंद दाराआड व्हायची! त्या चर्चेला गिरीष महाजन यांच्यासोबत राळेगणसिद्धीमधील एक स्थानिक गट कायम राहायचा! त्या गटासोबत गिरीष महाजन आधी चर्चा करायचे! तो गट सांगेल तसे गिरीष महाजन अण्णांसोबत बोलायचे आणि या सार्‍या चर्चा व्हायच्या त्या बंद दाराआड! काल मुंबईतील आंदोलनात जरांगे पाटलांनी कोणीच मध्यस्थ ठेवला नव्हता आणि चर्चा देखील चॅनलवाल्यांचे माईक आणि कॅमेरे चालू ठेवून! बाका प्रसंग असताना राधाकृष्ण विखे पाटलांनी अत्यंत चाणक्षपणे आणि संयमी भूमिका घेतली! व्यासपीठावर येताच विखे पाटलांनी जरांगे पाटलांसह समोर उपस्थित आंदोलनकर्त्या मराठ्यांना अभिवादन केले त्यावेळी त्यांच्या चेहर्‍यावरचा आत्मविश्वास बराच काही सांगून जात होता. त्याच आत्मविश्वासाने विखे पाटलांनी या उपोषणाचा समारोप केला आणि हातात माईक घेत जरांगे पाटलांसह संपूर्ण मराठा बांधवांचे आभार मानले. मराठ्यांच्या आरक्षणाचे क्रेडिट जरांगे पाटलांनी विखे पाटलांना दिले. मात्र, दुसर्‍या क्षणाला त्यांनी हे क्रेडीट राज्याचे मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रीमंडळातील सहकार्‍यांसह आरक्षणासाठी गठीत उपसमितीला दिले. खरेतर यासाठी खुप मोठे काळीज लागते आणि मनाचा मोठेपणा देखील! तोच मोठेपणा विखे पाटलांनी काल लाखो मराठ्यांना जसा दाखवून दिला तसाच दाखवून दिला तो राज्यातील सत्ताधार्‍यांना आणि विरोधकांनाही!

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर लाखो मराठे मुंबईत तळ ठोकून बसलेले! त्यातही अनेकांचा रोष राज्याचे नेतृत्व करणार्‍या देवेंद्र फडणवीस यांच्यावर! फडणवीसांमुळेच आरक्षण मिळण्यास अडचण येत असल्याचा सर्वांचाच सूर! अशा परिस्थितीत मराठा आरक्षणासाठी मंत्रीमंडळ उपसमितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड जाहीर करण्यात आली. मुंबईत मराठ्यांचा मोर्चा येण्यास सात- आठ दिवस बाकी असताना विखे पाटलांच्या नावाची घोषणा झाली. सात दिवसात काहीच होणार नाही असे वाटत असताना विखे पाटलांनी शेवटच्या तीन दिवसात रॉयल स्टोन बंगल्यात ठाण मांडले. विविध अधिकारी आणि सहकार्‍यांशी चर्चा करतानाच आरक्षणाच्या मुद्यावर मुंबईत आलेल्या मोर्चेकर्‍यांच्या विरोधात ब्र शब्द न बोलता या मोर्चेकर्‍यांच्या विरोधात बोलणार्‍यांना त्यांनी अडवले. जरांगे पाटलांच्या उपोषणस्थळी जाऊन कसलेल्या मुरब्बी नेतृत्वाने जे करायचे असते तचे विखे पाटलांनी केले. स्वत: हातात माईक घेऊन आंदोलनकर्त्यांसमोर जरांगे पाटलांना समजून सांगत, प्रसंगी लोणी- प्रवरात या, असे बोलतानाच ती वेळी तुमच्यावर येणार नाही असे आश्वस्त करताना उपोषणाच्या समारोपात स्वत: हातात पुन्हा माईक घेत संघर्षयोद्धा जरांगे पाटलांच्या नावाने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जयघोष करत मराठ्यांच्या आरक्षण प्रश्न सोडविण्याचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांना विखे पाटलांनी दिले. अत्यंत धूर्त आणि संयमी भूमिका त्यांनी घेतली आणि तीच भूमिका सरकारच्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारसाठी संकटमोचक ठरली.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर संपूर्ण राज्यात सरकारच्या विरोधात वातावरण तापले असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत संयम बाळगला. राज्यातील गुंतवणूक आणि रोजगारांचे सामंजस्य करार त्यांनी या परिस्थितीतही केले. आंदोलनाच्या निमित्ताने सातत्याने टीका होत असतानाही ते स्थितप्रज्ञ राहिले. कोणाहीबाबत आकस व्यक्त न करण्याचे भान ठेवत मराठा समाजाचे प्रश्न कसे सुटतील, यासाठी ते सातत्याने सर्वांच्या संपर्कात राहिले. खरे तर जरांगे पाटलांकडे राज्य सरकारचा प्रस्ताव देण्याआधी आणि त्यावर चर्चा होण्याआधी चर्चेच्या फेर्‍यांवर फेर्‍या होता कामा नये, याकडे फडणवीस यांनी कटाक्षाने लक्ष दिले आणि त्याची प्रचितीही आली. एकाच बैठकीत जरांगे पाटील उपोषण सोडवतील अशा पद्धतीने प्रस्ताव देण्यात आला. दुसरीकडे आंदोलक कितीही आक्रमक झाले तरी पोलिसांनी कुठेही बळाचा वापर करायचा नाही, अशा सक्त सूचना त्यांनी दिल्या होत्या, त्याची काटेकोर अंमलबजावणी झाली. पोलिसांचा संयम सुटला असता तर जे काही घडले असते त्याचे सारे खापर फडणवीस यांच्यावरच फुटले असते. आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांचा ङ्गरॉयल स्टोनफ हा बंगला गेले चार-पाच दिवस याबाबतच्या शासकीय हालचालींचे केंद्र राहिला. तेथे मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकांवर बैठका झाल्या. सर्व प्रश्न समजून घेत आणि आपल्या प्रदीर्घ राजकीय अनुभवाचा उपयोग करत जरांगे-पाटील यांना द्यावयाचा अंतिम मसुदा तयार करण्यात महत्त्वाची भूमिका विखे पाटलांनीच बजावली.

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मागील आंदोलन मुंबईत धडकले त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. त्यावेळी नवी मुंबईत एकनाथ शिंदे हे आंदोलनाला सामोरे गेले. यावेळी एकनाथ शिंदे व अजित पवार काहीसे तटस्थ भूमिकेत होते. मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणाबाबत उपसमिती गठीत केली. जरांगे हे मुख्यमंत्री तसेच सरकारवर टीका करत असताना विखे यांनी प्रतिवाद केला नाही. ते संयमी भाषेत भूमिका मांडत राहिले. आंदोलनावर टीका करणार्‍यांनाही त्यांनी खडसावले. जरांगे यांच्याशी चर्चेसाठी विखे पाटील हे आझाद मैदानात आले त्यावेळी त्यांनी आढेवेढे न घेता जरांगे यांची प्रत्येक मागणी चाणाक्षपणे हाताळली. उपोषण सोडताना जरांगे यांनी आंदोलनाच्या सांगतेचे श्रेय विखे यांना देण्याचा प्रयत्न केला. मात्र, विखे पाटलांनी हे श्रेय तत्काळ फडणवीस यांना दिले. फडणवीस यांच्यामुळेच आमची समिती निर्णय करू शकली, असे ते म्हणाले. आमची फसवणूक झाली तर आम्ही तुमच्या घरी येऊ असे जरांगे पाटील यांनी म्हणताच, ङ्गजरांगे पाटील यांचे माझ्या घरी स्वागत आहे; पण त्यांना आंदोलनासाठी माझ्या घरी कधीच यावे लागणार नाही,फ असे आश्वस्त करताच उपस्थित लाखो मराठा बांधवांनी विखे पाटलांना दिलेला प्रतिसाद निश्चितच नोंद घेणारा ठरला. त्याच मंचावर घोषणा देणे आणि जरांगे पाटलांना योद्धा म्हणून संबोधून विखे पाटलांनी जरांगे पाटलांसह आंदोलकांशी साधलेली जवळीक नेतृत्व परिपक्व असेल तर काय आणि कसे घडू शकते हेच सिद्ध करुन गेले. सर्वात महत्वाचे म्हणजे विखे पाटलांच्या या कृतीने मराठ्यांसह जरांगे पाटलांच्या मनात भाजपासह फडणवीस यांच्याबद्दल असणारी कटुता नक्कीच कमी करणारी ठरेल आणि त्याचा प्रत्यय येत्या काही दिवसात येईल! मात्र, त्याचे श्रेय फक्त आणि फक्त विखे पाटील यांच्या संयमी नेतृत्वालाच जाणार हे नक्की!

उपोषण सोडण्याची वेळ आली त्यावेळी जरांगे पाटलांनीही अत्यंत संयमी भूमिका घेतली आणि सरकारसह आंदोलनकर्त्यांकडून होकार मिळवत उपोषण सोडले. ङ्गसरकारने जो जीआर काढला किंवा आमच्या मागण्यांवर जे जीआर काढणार आहात त्यात आमच्या अभ्यासकांना वाटले की, काही त्रुटी आहेत, चुका आहेत तर त्या दुरुस्त केल्या जातील अशी हमी आम्हाला द्याफ, असे जरांगे पाटील हे मंत्री विखे-पाटील यांना म्हणाले. त्यावर, सरकार असे शुद्धिपत्रक नक्की काढेल, असा शब्द विखे-पाटील यांनी देताच आंदोलकांनी दिलेला प्रतिसाद जरांगे पाटलांसह विखे पाटलांचे मराठा आरक्षण मिळवून देणारे नेतृत्व म्हणून सिद्ध करणारा ठरला. आरक्षणाची मोहीम फत्ते झाल्यानंतर राज्याच्या कोनाकोपर्‍यातून आलेल्या मराठा बांधवांनी जयजयकाराच्या गगनभेदी घोषणा देत आणि टाळ्यांचा अभूतपूर्व कडकडाट करीत आझाद मैदान अक्षरश: दणाणून सोडले. त्यानंतर विजयाचा गुलाल उधळण्यासाठी आपापल्या ठिकाणी विजयी मुद्रेने रवाना झाले.

खरे तर एखादा नेता बेमुदत उपोषणासाठी आझाद मैदानावर बसतो आणि सर्व शय- अशयतांवर मात करत मराठा समाजाला न्याय कसा मिळवून देऊ शकतो, याची प्रचिती हजारो समाजबांधवांना आली. आंदोलकांच्या वतीने करण्यात आलेली एकेक मागणी आणि त्यावर सरकारने घेतलेला निर्णय असे सगळे जरांगे पाटलांसह मराठा आंदोलनकर्त्यांना विखे पाटलांनी समजावून सांगितले. आंदोलनाच्या खुल्या व्यासपीठावर विखे पाटील यांच्या बोलण्यात आणि समजावून सांगण्यात अत्यंत स्पष्टता होती. त्यामुळेच जरांगे पाटलांसह आंदोलनकर्त्या मराठा बांधवांच्या गळ्यातील विखे पाटील हे ताईत झाले. आंदोलनकर्त्याशी बंद खोलीत चर्चा करण्याऐवजी खुल्या व्यासपीठावर हजारो मिडीयाबांधवांसमोर, जनसमुदायासमोर चर्चा करण्यासाठी असणारे वाघाचे काळीज विखे पाटलांच्या माध्यमातून राज्यातीलच नव्हे तर देशभरातील जनतेला याची देही, याची डोळा पाहण्यास, अनुभवायास मिळाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मराठा आरक्षणाचा GR फाडला, OBC नेते आक्रमक, आता राज्यव्यापी आंदोलन

पुणे / नगर सह्याद्री - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी मुंबईतील आझाद मैदानावर...

मावा अड्ड्यावर छापा; एलसीबीची मोठी कारवाई

अहिल्यानगर | नगर सह्याद्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोनई पोलिस ठाण्याच्या हद्दीत मावा अड्डयावर छापा...

जादा परताव्याचे आमिष; १.६० कोटींची फसवणूक, १५ आरोपी, पोलिसांनी केले असे…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिल्यानगरमध्ये इनफिनाईट बिकन इंडिया प्रा. लि. आणि ट्रेड्स इन्व्हेस्टमेंट प्रा. लि....

जीआर मुळे सर्व मराठ्यांचा फायदा; कसे ते पहा, कोण काय म्हणतय पहा…

छत्रपती संभाजीनगर / नगर सह्याद्री हैद्राबाद गॅझेटच्या नोंदी लक्षात घेऊन मराठा समाज ओबीसीत जाणार...