spot_img
अहमदनगरRadhakrishna Vikhe Patil : विखे पाटलांनी काढला पवारांचा इतिहास; स्वकीय सोडून का...

Radhakrishna Vikhe Patil : विखे पाटलांनी काढला पवारांचा इतिहास; स्वकीय सोडून का गेले…, त्यांनी कन्येची चिंता करावी

spot_img

लोणी / नगर सह्याद्री –
Radhakrishna Vikhe Patil : शरद पवारांनी बाळासाहेब विखेंपासून विरोध करण्याची परंपरा आजही कायम ठेवली आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये नेत्या-नेत्यांमध्ये त्यांनी भांडणं लावायचं काम केलं. त्यामुळे जिल्ह्याची प्रगती झाली नाही असे सांगतानाच शरद पवारांनी अहमदनगर जिल्ह्यात जास्त सभा घ्याव्यात, हाच आमचा आग्रह आहे. त्यांनी जिल्ह्याचं कस वाटोळं केलं हे जाहीरपणे बोलता येईल. स्वकीय सोडून का गेले याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे असे सांगत आपल्या कन्येच्या विजयाची चिंता करावी असे ते म्हणाले. तसेच शरद पवार यांचा इतिहास सांगून पवारांनी केलेल्या आरोपांना चोख उत्तर दिले. ते लोणी येथे माध्यमांशी बोलत होते.

विखे पाटील म्हणाले, स्वतःला राष्ट्रीय नेते समजतात आणि अवघे १० उमेदवार तुम्हाला देता आले. काँग्रेसची हीच अवस्था आहे. स्वतःला नेते समजणार्‍या थोरात यांना जिल्ह्यात एकही जागा घेता आली नाही. विखेंवर काय टीका करायची करा मात्र तुमच अपयश तुम्ही मान्य करा, असं म्हणत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

पवारांवर साधला निशाणा
अजित पवार आणि सोबतच्या लोकांच्या भूमिकेवर शरद पवारांनी टीका केली त्याला विखे पाटलांनी उत्तर दिलं आहे. शरद पवारांमध्ये कुठे सातत्य आहे कधी पहाटे शपथविधी करायला सांगतात कधी भाजपाला पाठिंबा देऊन तो काढून घ्यायला सांगतात. काँग्रेसमधून विदेशी मुद्द्यावर फारकत घ्यायची आणि ज्यांच्याशी फारकत घेतली त्यांच्याच पुन्हा पायाशी जाऊन बसायचं, असं विखे पाटील यांनी सांगितले. स्वकीय सोडून का गेले याचे त्यांनी आत्मपरिक्षण करावे. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी त्यांच्या कन्येच्या विजयाची चिंता करावी. त्यांच्या वक्तव्यांना मी फारसं महत्त्व देत नाही. खोट बोलण्याचा त्यांचा धंदाच आहे.

थोरातांवर घणाघात
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचाही विखे पाटलांनी समाचार घेतला. संपदा पतसंस्थेमुळे बाळासाहेब थोरात यांना वैफल्य आले आहे. बँकेच्या चेअरमनने मोठा घोटाळा केला. तो आज जेलमध्ये आहे. अनेक कार्यकर्ते जेलमध्ये जातात याचा विचार बाळासाहेबांनी करावा. त्यांच्याच नेतृत्वात एक समिती नेमून चौकशी करायला मी तयार आहे. माफीयांना पाठीशी घालून आम्ही राजकारण करत नाही, असे म्हणत पालकमंत्री विखे पाटलांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर घणाघात केला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राजकारणात खळबळ!, शरद पवार-अजित पवार आज एकत्र येणार?

मुंबई । नगर सहयाद्री:- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी काल...

नागरिकांनो सतर्क राहा! हवामान खात्याचा हादरवणारा रिपोर्ट; ‘या’ जिल्ह्यांना हाय अलर्ट?

Weather Update: राज्यातील तापमानात घट झाली असून उकाड्यातही दिलासा मिळाला आहे. आज मध्य महाराष्ट्र...

शरद पवारांच्या वक्तव्यावर मंत्री विखे पाटलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, ‘दोघं एकत्र आले तर…’

Politics News: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा राज्यात खूप रंगल्या असताना, गुरुवारी राज्याचे जलसंपदा...

आजचे राशी भविष्य! ‘मे’ महिन्यातील उत्तम दिन, ‘या’ राशीच्या जीवनात मोठे बदल घडणार

मुंबई। नगर सह्याद्री मेष राशी तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास लाभदायक दिवस. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची...