spot_img
महाराष्ट्रबोगस मतदारांच्या आरोपावरून विखे-थोरात भिडले, काय म्हणाले पहा

बोगस मतदारांच्या आरोपावरून विखे-थोरात भिडले, काय म्हणाले पहा

spot_img

शिर्डी | नगर सह्याद्री
बोगस मतदानाबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राहुल गांधी यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील महाराष्ट्रासह विखे पाटलांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात मतदार नोंदणी घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. या आरोपावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार आणि देशात लोकसभेच्या जागा बोगस मतदानाने निवडून आल्या का? असा प्रश्न उपस्थित करत विखे पाटलांनी राहुल गांधी आणि बाळासाहेब थोरात यांच्यावर पलटवार केला आहे. राहुल गांधी यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील महाराष्ट्रातील मतदार नोंदणी घोटाळा बाबत आरोप केले आहेत. बाळासाहेब थोरात म्हणाले, राहुल गांधी यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे निवडणूक आयोगाने देणे आवश्यक आहे. मात्र चोरी ओळखली गेल्याने भारतीय जनता पक्ष अस्वस्थ झाला आहे. मूळ विषयाला बगल देऊन उलट सुलट बोलणे मुख्यमंत्री पदाला शोभणारे नाही. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने निरनिराळे फंडे वापरले.. निवडणूक आयोगाने डिजिटल सॉफ्ट कॉपी दिली असती तर अनेक मतदारसंघाची तपासणी करता आली असती. असे थोरात म्हणाले.

तसेच ते पुढे म्हणाले, राहुल गांधी आणि त्यांच्या टीमने सहा महिने बारकाईने अभ्यास करून हा सगळा प्रकार समोर आणला आहे. निवडणूक आयोगाने भाजपला मदत करण्यासाठी हेतुपरस्पर अनेक गोष्टी केल्या आहेत. हा लोकशाहीला खरा धोका आहे. संगमनेर मतदारसंघाबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे जी माहिती मागितली ती दिली गेली नाही. आमच्या मनातही अनेक शंका आहेत. शिर्डी मतदारसंघातही हजारो मतदारांची नोंदणी वाढवून घोटाळा झाला आहे. निवडणूक आयोगाकडे तक्रार करूनही कोणतीच कारवाई झाली नाही. असा आरोप काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

अपयश झाकण्यासाठी बेताल वक्तव्य ः मंत्री विखे
राहुल गांधी आणि काँग्रेसचे नेते स्वतःचे अपयश झाकण्यासाठी बेताल वक्तव्य करत आहेत. तेलंगणात त्यांचे सरकार आल्यावर बोगस मतदान झाल्याचा आरोप केला का? कर्नाटकचे काँग्रेस सरकार बोगस मतदानामुळे आले का? काँग्रेसला लोकसभेच्या जागा बोगस मतदानाने मिळाल्या का? असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. लोकांना यांचा खरा चेहरा समजल्याने त्यांना विधानसभेला यश मिळाले नाही. लोकांनी महाविकास आघाडीला धुडकावून लावले. अनेक प्रस्थापित नेते पराभूत झाले, याला तुम्ही बोगस मतदान म्हणणार असाल तर हा मतदारांचा अपमान आहे. राहुल गांधी भारतात कमी आणि परदेशात जास्त बोलतात. बोगस मतदानाबाबत शपथपत्र केले तर आरोप सिद्ध करावे लागतील. तसेच राहुल गांधींवर गुन्हा दाखल होऊन सदस्यत्व रद्द होऊ शकते. बेताल वक्तव्याने जनतेचे मनोरंजन होईल मात्र राहुल गांधींना कुणीही गांभीर्याने घेत नाही. असा पलटवार विखे पाटलांनी केला आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरपरिषद- नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस

मुंबई / नगर सह्याद्री - राज्यातील २४६ नगरपरिषद आणि ४२ नगर पंचायतीसाठी १० नोव्हेंबर पासून...

बिबट्याला गोळ्या घाला…; निंबळक बायपास चौकात रास्तारोको

हिंगणगाव, हमीदपूर, निंबळक, इसळक, खारेकर्जुने ग्रामस्थांचा निंबळक बायपास चौकात रास्तारोको अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- गेल्या...

आता शिवशक्ती बरोबर भीमशक्ती; ‘महापालिका निवडणुकीसाठी आघाडी’; किरण काळे यांनी दिली मोठी माहिती..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. नगरकरांनी मनपा कारभारासाठी कायम...

चुलत्याला वाचवण्यासाठी गेलेल्या पुतण्यावर धारदार शस्त्राने सपासप हल्ला, वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्रील:- माझ्या शेतातील लाकडे का आणली? असा जाब विचारत एका तरुणाला...