spot_img
अहमदनगरविजयाचा कॉन्फिडन्स! निकालापूर्वीच आमदार जगताप यांचे झळकले बॅनर

विजयाचा कॉन्फिडन्स! निकालापूर्वीच आमदार जगताप यांचे झळकले बॅनर

spot_img

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी चुरशीने मतदान झाले. जिल्ह्यातील 12 ही विधानसभा मतदारसंघात मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत काँटे की टक्कर पहावयास मिळाली. जिल्ह्यात सरासरी 71 टक्के मतदान झाले आहे. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असली तर निकालापूवच नगर शहर व पारनेर मतदारसंघात आमदार संग्राम जगताप व राणी लंके यांचे विजयाचे फ्लेक्स झळकले आहेत.

20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. किरकोळ प्रकार वगळता शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यातील 12 ही मतदारसंघात मोठ्या चुरशीने मतदान झाले असून सरासरी 71 टक्के मतदान झाले आहे. मतदानाचा टक्का वाढल्याने नेमका धक्का कोणाला बसतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. अशातच आता चौकाचौकात कोण विजयी होणार कोण पराभूत होणार याच्या खमंग चर्चा रंगू लागल्या आहेत. मतदान केंद्रनिहाय कोणाला किती मतदान होईल याची आकडेमोड जोरात सुरु आहे. अनेकांच्या पैजाही पडल्या आहेत.

आपल्या उमेदवाराचा विजय निश्चित असल्याचे गृहीत धरुन नगर शहर विधानसभा मतदारसंघात व पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात आमदार संग्राम जगताप व राणी निलेश लंके यांच्या विजयाचे फ्लेक्स झळकले आहेत. निकालापूवच फ्लेक्स झळकल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेर राजकीय कुस्त्या लावण्यासाठी माहीर ; डॉ. सुजय विखे पाटील नेमकं काय म्हणाले पहा…

  बाबासाहेब तांबे सोशल फाउंडेशनच्या आखाड्याचा जिल्ह्यात नावलौकिक पारनेर | नगर सह्याद्री अंबिका माता यात्रा उत्सवा निमित्ताने...

रंजित कासले प्रकरणात मोठं ट्विस्ट; ‘त्या’ 10 लाख रुपयांबाबत धक्कादायक खुलासा, अडचणीत वाढ

बीड / नगर सह्याद्री मोठी बातमी समोर येत आहे, निलंबित पोलीस अधिकारी रंजित कासले...

पावसाचा पहिला अंदाज आला! राज्यात ‘या’ तारखेला कोसळणार?

Weather Update: -भारतीय हवामान विभागाने २०२५ च्या मान्सून २०२५ च्या हंगामासाठीचा आपला अंदाज जाहीर...

‘राष्ट्रवादीचे सभासद नोंदणीतून बळ वाढणार’; टाकळी ढोकेश्वर गटातून अभियानाला सुरुवात

पारनेर | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी अभियानाला पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर जिल्हा...