spot_img
महाराष्ट्रPankaj Udhas passed away : ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचं निधन !

Pankaj Udhas passed away : ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचं निधन !

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : आपल्या जादूई आवाजाने मागील अनेक दशके रसिकांच्या मनावर राज्य करणारे गझल गायक पंकज उधास यांचे दीर्घ आजाराने आज निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबाबतची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली. पंकज उदास यांनी गायलेली अनेक गाणी, गझल आजही संगीतप्रेमींच्या ओठांवर आहेत.

ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचं निधन झालंय. दीर्घ आजारपणामुळे पंकज यांनी ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास घेतला. पंकज उधास हे एक भारतीय गझल आणि पार्श्वगायक होते, जे हिंदी चित्रपट आणि भारतीय पॉपमधील त्यांच्या कामांसाठी ओळखले गेले. १९८० मध्ये ‘आहत’ नावाच्या गझल अल्बमच्या रिलीजने त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि त्यानंतर १९८१ मध्ये मुकरार, १९८२ मध्ये तरन्नम, १९८३ मध्ये मेहफिल,

१९८४ मध्ये रॉयल अल्बर्ट हॉल येथे पंकज उधास लाइव्ह, १९८४ मध्ये नयाब आणि १९८८ मध्ये फ्री असे अनेक हिट गाणे रेकॉर्ड केले. १९८६ मध्ये आलेल्या ‘नाम’ चित्रपटातील “चिठ्ठी आयी है” गाण्याने उधास यांना आणखी प्रसिद्धी मिळवून दिली. २००६ मध्ये त्यांना पद्मश्री हा भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रतीक्षा संपली! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणाला कोणते खाते मिळाले, पहा संपूर्ण यादी

मुंबई / नगर सह्याद्री - Maharashtra Portfolio Allocation : मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप...

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...