spot_img
अहमदनगरज्येष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार दत्ता इंगळे यांचे निधन

ज्येष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार दत्ता इंगळे यांचे निधन

spot_img

अहमदनगर | नगर सहयाद्री:-
शहरातील ज्येष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार दत्ता इंगळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मागील दोन ते तीन आठवड्यापासून आजारी असल्याने ते पुणे येथील रुग्णालयात उपचार घेत होते. शनिवारी (दि.7 सप्टेंबर) त्यांची प्राणज्योत माळवली. ते 57 वर्षाचे होते.

चिचोंडी पाटील (ता. नगर) मुळ गाव असलेले इंगळे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून येऊन त्यांनी शहरात वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून काम सुरु केले होते. गेल्या तीन दशकापासून त्यांनी वृत्तपत्र छायाचित्रकार क्षेत्रात योगदान देऊन आपला नावलौकिक मिळवला. छायाचित्रकारासह बातमीदार म्हणूनही ते कार्यरत होते.

छायाचित्रणातील विविध राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार देखील त्यांना मिळाले आहेत. त्यांच्या निधनाने एक चांगला वृत्तछायाचित्रकार हरपला आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खासदार निलेश लंकेंना सुजित झावरे यांचा धक्का ; विश्वासू सहकारीच लावला गळाला

ढवळपुरी गटात राजकारण फिरणार पारनेर/ नगर सह्याद्री : सुजित झावरे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ...

सेनापतींच्या विचारांची देशाची गरज : कवी इंद्रजीत भालेराव

  सेनापती बापट साहित्य संमेलनास सुरुवात सुनील चोभे / नगर सह्याद्री - सध्याच्या काळात एकूण राजकारणात आणि...

दिवसाढवळ्या महिलेचे ‘जेसीबी’ने पाडले घर तर तहसिलच्या आवारातून डंपर चोरणारे जेरबंद; वाचा अहिल्यानगर क्राईम..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- निंबोडी शिवारात एका महिला गृहिणीच्या घरावर दिवसाढवळ्या ‘जेसीबी’ फिरवल्याची घटना...

आरक्षित कोटा ठरला, आरक्षण सोडतीकडे लक्ष

34 जागांवर महिला आरक्षण | 18 जागांवर ओबीसींना संधी | 11 नोव्हेंबर रोजी सोडत अहिल्यानगर...