spot_img
महाराष्ट्रज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन!

ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन!

spot_img

मुंबई । नगर सहयाद्री
मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचे गुरुवारी (१९ जून २०२५) संध्याकाळी निधन झाले. ते ज्येष्ठ दिवंगत अभिनेत्री रीमा लागू यांचे पूर्वाश्रमीचे पती होते. त्यांच्या निधनामुळे मराठी कलासृष्टीवर शोककळा पसरली असून, अनेक कलाकारांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांच्या पार्थिवावर आज (शुक्रवार, २० जून) अंत्यसंस्कार होणार आहेत.

विवेक लागू यांचा जन्म पुण्यात झाला होता. त्यांना सुरुवातीपासूनच लेखन आणि दिग्दर्शनाची आवड होती, जी त्यांना मुंबईच्या नाट्यसृष्टीत घेऊन आली. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीवरून केली. ‘चल आटप लवकर’, ‘प्रकरण दुसरं’ आणि ‘सर्वस्वी तुझीच’ यांसारख्या गाजलेल्या नाटकांचे लेखन आणि दिग्दर्शन त्यांनी केले, ज्यासाठी त्यांना पुरस्कारही मिळाले.

संगीताची आवड असूनही, त्यांचा अभिनयाकडे वळण्याचा प्रवास अपघातानेच झाला. विजय मेहता यांच्या अभिनय शिबिरात त्यांना सहभागी होण्याची संधी मिळाली. मुंबईत एक महिना विनामूल्य राहता येणार असल्याच्या विचाराने त्यांनी हे शिबिर जॉईन केले आणि अभिनयाचे धडे गिरवले. पुढे त्यांनी अभिनयातही आपले कौशल्य सिद्ध करत पुरस्कार पटकावले.

विवेक लागू यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. ‘व्हॉट अबाऊट सावरकर’ ‘अग्ली’ आणि ‘३१ दिवस’ हे त्यांचे काही उल्लेखनीय चित्रपट आहेत. याशिवाय, ‘चार दिवस सासूचे’ आणि ‘हे मन बावरे’ या लोकप्रिय मालिकांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या स्मरणात राहिल्या आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नडणाऱ्यांसह काँग्रेस अन्‌‍ ठाकरे सेना क्लीन बोल्ड

महानगरपालिकेत डॉ. सुजय विखे पाटील -आमदार संग्राम जगताप एक्सप्रेेस निर्णायक ठरणार! सारिपाट / शिवाजी शिर्के प्रभाग...

वनविभागाच्या हलगर्जीपणामुळेच तरुणाचा बळी!, कळस येथील घटनेला जबाबदार कोण?

पिंजरा लावण्याची जबाबदारी का झटकली? गणेश जगदाळे। पारनेर पारनेर तालुक्याच्या पश्चिमेला असलेल्या जुन्नर तालुका राज्यात बिबट्या...

जिल्ह्यात लेझर लाईट, दबाव हॉर्न व कार्बन डायऑक्साइड वायूच्या वापरावर बंदी

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (१) नुसार...

मैदान ठरलं; तोडफोडीमुळे ‘अशी’ राजकीय गणिते बदलली!, आता आरक्षणाकडे नजरा..

सुनिल चोभे | नगर सह्याद्री अहिल्यानगर महापालिका निवडणुकीची उलटगणती सुरु झाली असून निवडणुकीचा राजकीय रंग...