शेवगाव, पाथर्डी, जामखेडमध्ये दाणादाण | पाच दिवस यलो अलर्ट
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
सलग दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला. शेवगाव, पाथड, जामखेड, कर्जत व अहिल्यानगर तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्याच्या दक्षिण भागातील नद्यांना पूर आले असून शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. एकाच दिवसात जिल्ह्यात 44.6 मिलीमिटर पाऊस झाला आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने अहिल्यानगर जिल्ह्यासाठी पुढील पाच दिवस यलो अलर्ट जाहीर केला आहे.
गेल्या आठ-दहा दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात परतीचा मान्सून धो धो बरसत आहे. रविवारी जिल्ह्याच्या दक्षिण भागाला चांगलेच झोडपून काढले. तर सोमवारीही जिल्ह्यातील शेवगाव, पाथड, जामखेडमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे चांगलीच दाणादाण उडवली. जिल्ह्यातील नद्यांना पूर आले आहेत. नदी नाले तुडूंब भरले आहेत. जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. नद्यांना पूर आल्याने नदी काठच्या लोकांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
दहा दिवसांपासून शाळा बंद, चाराही नाही अन दुधही घरीच
दररोज होत असलेल्या पावसामुळे जुनी वाडी ते बारदरी गेल्या 10 दिवसापासून संपर्क तुटलेला आहे. जनावरांना चाराही नाही, मुलांच्या शाळाही बंद आहेत. दुधही घरीच आहे. पावसामुळे नारिकांचे प्रचंड हाल होत आहेत. सरकारकडे नदीवरील पुलासाठी वारंवार प्रस्ताव देऊनही कोणतीही अंमलबजावणी होत नाही. तातडीने पुलाचे काम न झाल्यास रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
सोमवारी एकाच दिवसात जिल्ह्यात 44.6 मिलीमिटर पाऊस
रविवारपाठोपाठ सोमवारीही जिल्ह्याला अक्षरशः पावसाने झोडपून काढले. नगर 55.3, पारनेर 37, श्रीगोंदा 36, कर्जत 53.5, जामखेड 85.2, शेवगाव 120.6, पाथड 91.7, नेवासा 44.1, राहुरी 18.3, संगमनेर 10.8, कोपरगाव 18.9, श्रीरामपूर 20.9, राहाता 20.4 मिलीमिटर पाऊस झाला. जिल्ह्यात एकाच दिवसात 44.6 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.
सीना नदीला सलग दुसऱ्या दिवशी पूर
रविवारी आणि सोमवारी नगर शहरासह जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. जेऊर परिसरात आणि नगर शहरात झालेल्या पावसामुळे सीना नदीला सलग दुसऱ्या दिवशीही पूर आला होता. त्यामुळे नगर-कल्याण महामार्गावरील वाहतूक दुसऱ्यादिवशीही बंद होती. या मार्गावरुन प्रवास करणाऱ्यांना दुसऱ्या मार्गाचा अवलंब करावा लागला. नगर शहरासह तालुक्यात बहुतांश भागात गेल्या आठ दिवसांपासून पावसाची कमी अधिक प्रमाणात पावसाची संततधार सुरु आहे. सोमवारी रात्रीही संततधार सुरुच होती. रविवारी तब्बल 24 मंडलात अतिवृष्टी झाली तर सोमवारीही जिल्ह्यातील अनेक मंडलात अतिवृष्टी झाली असून जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे.
35 मंडलात सोमवारी अतिवृष्टी
सावेडी, 84, केडगाव 70.5, वाळकी 69.3, रुईछत्तीशी 67.8, नेप्ती 70.8, भाळवणी 69.8, मांडवगण 68.3, कोंभळी 76.5, मिरजगाव 101.3, माही 88, अरणगाव 115.3, खर्डा 76.8, नान्नज 85.8, नायगाव 94.3, पाटोदा 85.8, साकत 94.3, शेवगाव 131.3, भातकुडगाव 83.8, बोधेगाव 148.8, चापडगाव, 148.8, ढोरजळगाव 83.8, एरंडगाव 112.8, दहिगाव न 112.8, मुंगी 142.8, पाथड 65.3, माणिकदोंडी 65.3, टाकळी 131, कोरडगाव 107.5, करंजी 66.5, मिरी 76.5, तिसगाव 75, खरवंडी 131, अकोला 107.5, सलाबतपूर 150.3, कुकाणा 83.8 मिलीमिटर पाऊस झाला.
शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा; पालकमंत्री
कोल्हार, हनुमंतगाव, पाथरे व पंचक्रोशीतील गावांमध्ये पावसामुळे झालेल्या शेतीपीकांच्या नुकसानीची तातडीने सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, तसेच ओढे-नाल्यांवरील अतिक्रमण कोणालाही पाठीशी न घालता एका महिन्यात हटविण्याचे सक्त निर्देश जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. अतिवृष्टीमुळे भगवतीपूर, पाथरे, हनुमंतगाव या परिसरात शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अतिक्रमणामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडवला गेल्याने पाणी शेतात घुसल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर नुकसानीची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महसूल, कृषी, जलसंपदा, बांधकाम यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची लोणी येथे बैठक झाली.बैठकीस शिड उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, राहाता तहसीलदार अमोल मोरे, कृषी अधिकारी आबासाहेब भोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्रीनिवास वर्पे, जलसंपदा विभागाचे स्वप्निल काळे आदी अधिकारी तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
अतिक्रमणामुळे झालेल्या नुकसानीबाबत पालकमंत्र्यांनी महसूल व जलसंपदा विभागाला संयुक्त पाहणी करून तातडीने ओढे-नाले अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश दिले. आवश्यक असल्यास मोजणी करून कार्यवाही करावी, कोणतेही अतिक्रमण सहन केले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. अनधिकृत प्लॉट विक्रीच्या तक्रारींच्या अनुषंगाने कोल्हार व लोणी खुर्द येथील प्लॉट व्यवहारांची पुन्हा तपासणी करावी, नियमांनुसार सर्व तरतुदी पूर्ण झाल्याची खात्री करूनच व्यवहार करण्यात यावेत, असे निर्देश प्रांताधिकारी व तहसीलदारांना देण्यात आले.
कृषी विभागाने सरसकट पंचनामे करावेत तसेच ई-पिक पाहणीतील मर्यादाही लक्षात घ्याव्यात. ज्यांनी पीकविमा योजनेत सहभाग घेतलेला नाही अशा शेतकऱ्यांना शासन नियमांनुसार मदत मिळेल यासाठी प्रयत्न करावेत, असेही मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.वन विभागाने बिबट्याच्या वाढत्या हालचालींवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना कराव्यात, पिंजरे उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव सादर करावा, निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. पशुसंवर्धन विभागाने लंपी साथीबाबत गांभीर्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचेही निर्देश त्यांनी दिले.

brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (0.43333334, 0.41208333);sceneMode: 0;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 35;
सुपा परिसरात अतिवृष्टी: ‘तो’ रस्ता दहा तास बंद, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, वाचा सविस्तर
सुपा | नगर सह्याद्री
पारनेर तालुक्यातील सुपा परिसरातील सुपा, वाळवणे, रायतळे, अस्तगाव, पिंपरी गवळी, रांजणगाव मशीद, आपधूप, बाबुड, कडूस, पळवे खुर्द, पळवे बुद्रुक, जातेगाव, घाणेगाव, गटेवाडी, म्हसणे सुलतान, मुंगशी, हंगा, नारायणगव्हाण, वाडेगव्हाण या गावात गेले आठ दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातला असून शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
सोमवार दि.22 रोजी रात्री 11 ते मंगळवार दि. 23 रोजी सकाळी 9 च्या दरम्यान ढगफूटी सदृश पाऊस झाला. बेसुमार झालेल्या पावसाने पारनेर – विसापूर रस्त्यावर बाबुड येथील बस क्रमांक 1 वरील पुलावरून जोराचे पाणी वाहत असल्यामुळे सुमारे 10 तास रस्ता बंद होता. यामुळे ग्रामस्थ, विद्याथ, औद्योगिक वसाहतीमधील कामगार, दुध उत्पादक शेतकरी यांचे प्रचंड हाल झाले. सकाळी ग्रामस्थांनी जेसीबीच्या सहायाने पुलाच्या मोरया मोकळ्या केल्यानंतर व पाणी कमी झाल्यानंतर रस्ता सुरु करण्यात आला.
तालुक्यातील नारायणगव्हाण व वाडेगव्हाण परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झाला आहे. शेतकऱ्यांची शेतातील उभी पिके भुईसपाट झाली आहेत. स्थानिकांनी माहिती देताना सांगितले की आठ ते दहा वर्षातील सर्वात मोठा ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे ओढ्यांना पूर आला तसेच शेती पिकांचे, शेतीच्या बांधांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतातील माती वाहून गेली आहे. गेल्या आठ ते दहा वर्षातील सगळ्यात मोठा पाऊस बरसल्याने आनंद व्यक्त करावा की शेतीच्या नुकसानामुळं चिंता व्यक्त करावी, अशी द्विधा मनस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे.
पावसाने कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे सर्व शेतकऱ्यांची दैणा उडाली आहे. या पावसात पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.सुपा परिसरातील गावात मागील 7 ते 8 दिवसांपासून सातत्याने पाऊस होत असल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने पिकांचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
पुलाची उंची वाढवा!
गेली आठ दिवसांपासून सुपा परिसरात परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. आठ दिवसातून बाबुड येथील बस क्रमांक 1 येथील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे हा रस्ता बंद होता. सोमवार दि. 22 रोजी झालेल्या मुसळधार पावसाने देखील हा रस्ता 10 तास बंद होता. यादरम्यान ये- जा करणाऱ्या प्रवाशी व विद्यार्थ्यांचे हाल झाले. या पुलाची उंची जमिनीलगत असल्यामुळे साधारण पावसात देखील हा रस्ता तासंतास बंद रहातो. यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पुलाची उंची वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
पावसाबाबत हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट, जोर आणखी वाढणार
पुणे : राज्यात सध्या काही भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुंबई, पुणे, बीड, धाराशिव आसपासच्या भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. या आठवडाभरात राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला. तर शुक्रवारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. राज्यभरात पावसाने कहर केला आहे, संपूर्ण मराठवाडा पाण्याखाली गेला असून मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचं नुकसान झालं आहे. अशातच आणखी एक आठवडा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरामध्ये सध्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून परिणामी राज्यात पुढील तीन दिवसांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, राज्यात दि. २६ ते २८ सप्टेंबर यादरम्यान काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिली. मराठवाड्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाने धुमाकूळ घातल्याने पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज
बंगालच्या उपसागरावर तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र विरलं असलं, तरी त्याचा परिणाम अजूनही काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या स्वरूपात जाणवत आहे. दरम्यान, येत्या बुधवारी (दि. २४) पुन्हा एक नवीन कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाचे सानप यांनी वर्तवला आहे. मॉन्सून पुन्हा एकदा सक्रिय होत असल्यामुळे त्याच्या परतीच्या प्रवासाबाबत सध्या अंदाज बांधता येत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, हे कमी दाबाचं क्षेत्र विरल्यानंतर मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी नमूद केलं.लदरम्यान, मॉन्सूनने सोमवारी गुजरात, राजस्थान, हरियाणा व पंजाबच्या काही भागांमधून परतला आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार मंगळवारी (दि. २३) कोकण, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढील दोन ते दिवसांत राज्यात बहुतांश जिल्ह्यांत मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.
बाहेर पडताना काळजी घ्या
– राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. अंदाजानुसार दुपारनंतर मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता असून, २६ तारखेपासून कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव अधिक जाणवेल.
– विशेषतः विदर्भ व मराठवाड्यातील पूर्व व दक्षिणेकडील भागांत दुपारनंतर पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. २७ सप्टेंबर रोजी विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांत पाऊस वाढू शकतो. यातील काही भागांत मुसळधार पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर २८ तारखेला राज्याच्या पश्चिमेकडील भागांत पावसाचा जोर टिकून राहील, असा अंदाज आहे.
– सध्या नवरात्रोत्सव सुरू असल्याने सायंकाळी बाहेर पडताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.