spot_img
अहमदनगरवारी अधुरीच! भरधाव कंटेनरची दिंडीला धडक

वारी अधुरीच! भरधाव कंटेनरची दिंडीला धडक

spot_img

Pune-Nashik highway Accident: पुणे-नाशिक महामार्गावर अपघात घडल्याची बातमी समोर आली आहे. भगवंताच्या नामस्मरण करत निघालेल्या वारकऱ्यांवर काळाने घाला घातला आहे.  भीषण अपघात चार वारकर्‍यांचा मृत्यू झाला असून आठ ते दहा जण गंभीर जखमी झाले आहे.

बाळासाहेब अर्जुन गवळी (रा. मढी, ता. कोपरगाव), बबन पाटिलबा थोरे (चोपदार) (रा. द्वारकानगर, शिर्डी), भाऊसाहेब नाथा जपे (वय ५०, रा. कनकोरी, ता. राहाता), ताराबाई गंगाधर गमे (रा. कोर्हाळे, ता. राहाता) या चार वारकर्‍यांचा गंभीर मार लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

तर बिजलाबाई अशोक शिरोळे (वय ६०, रा. वाकळी, ता. राहाता), राजेंद्र कारभारी सरोदे (वय ५०, रा. मढी, ता. कोपरगाव), भाऊसाहेब दशरथ गायकवाड (वय ५०, रा. वेस, ता. कोपरगाव), ओंकार नवनाथ चव्हाण (वय १७, रा. मढी खुर्द, ता. कोपरगाव), निवृत्ती पुंजा डोंगरे (वय ६०, रा. पंचाळा, ता. सिन्नर), शरद सचिन चापटे (वय १७, रा. परभणी), अंकुश ज्ञानेश्वर कराळे (वय ३५, रा. शिर्डी), मिराबाई मारुती ढमाले (वय ६०, रा. वावी, ता. सिन्नर) हे वारकरी गंभीर जखमी झाले आहेत.

शिर्डी येथील काशिकानंद महाराज यांची पायी दिंडी शिर्डीहून आळंदीकडे जात होती. दरम्यान पुणे-नाशिक महामार्गावर या दिंडीत भरधाव वेगाने जाणारा एमएच १२ व्हिटी १४५५ कंटेनर घुसल्याने हा भीषण अपघात झाला आणि या अपघातात चार वारकर्‍यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर आठ वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.

अपघातानंतर घटनास्थळी युद्ध पातळीवर मदतकार्य सुरू होते. आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ मदत करत जखमींना रुग्णालयात दाखल केले. कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. संतप्त नागरिकांनी या कंटेनरची तोडफोड केली आहे. अपघातात वारकरी मृत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नालायक सरकार… मनोज जरांगे पाटील कडाडले, थेट केले गंभीर आरोप..

बीड / नगर सह्याद्री - मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि माजी मंत्री...

ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

नाशिक / नगर सह्याद्री : येथील इगतपुरीमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना (शिंदे गट) ला...

​हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा, कुठे घडला प्रकार पहा

​अहिल्यानगर / नगर सह्याद्री - माहेरहून राहिलेल्या हुंड्याच्या पैशांची मागणी करत, तसेच चारित्र्यावर संशय...

खारेकर्जुनेतील नरभक्षक बिबटे जेरबंद; ग्रामस्थांनी केला विरोध, काय काय घडलं

एक पिंजर्‍यात अडकला | दुसर्‍याला विहिरीतून बाहेर काढला | ठार मारण्याच्या भूमिकेवर ग्रामस्थ ठाम अहिल्यानगर...