राहता । नगर सहयाद्री:-
राहता तालुक्यातील पुणतांबा गावात अज्ञात समाजकंटकांनी एका धार्मिकस्थळी तोडफोड केल्याची घटना सोमवारी सकाळी निदर्शनास आली. त्यामुळे सकाळपासून नागरिकांनी प्रचंड गर्दी केली.
आठ दिवसापूर्वी अशीच धार्मिक स्थळातील मूर्तींची बिटंबना झाली होती. त्यात एकाला पोलिसांनी अटक केली होती. पण आता पुन्हा एकदा धार्मिक स्थळात तोडफोड झाल्यानेने तणाव निर्माण झाला होता.
आरोपीच्या अटकेसाठी गावकरी एकवटले असून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. गाव बंद ठेवत गावकऱ्यांकडून रास्ता रोको आंदोलन करत आरोपीच्या अटकेची मागणी करण्यात आली आहे सध्या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.