spot_img
ब्रेकिंगधार्मिक स्थळाची तोडफोड; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

धार्मिक स्थळाची तोडफोड; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री
निमगाव घाणा (ता. नगर) येथे एका धार्मिक स्थळी तोडफोड झाल्याची घटना समोर आली आहे. सदर ठिकाणी अज्ञात व्यक्तीने तोडफोड करून विटंबना केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. शनिवारी (25 जानेवारी) सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली असून मंगळवारी (28 जानेवारी) एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

बाबासाहेब रामदास जपे (वय 41 रा. निमगाव घाणा, ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. शनिवारी सायंकाळी 7 वाजता गावातील नागरिक धार्मिक स्थळी होते. मात्र, दुसऱ्या दिवशी रविवारी (26 जानेवारी) सकाळी 7 वाजता रामदास गायकवाड हे धार्मिकस्थळी साफसफाईसाठी गेले असता, त्यांनी पाहिले की, टणक वस्तूने तोडफोड करण्यात आली आहे. त्यांनी तात्काळ गावकऱ्यांना माहिती दिली, आणि मोठ्या संख्येने लोक धार्मिक स्थळी जमा झाले.

स्थानिकांनी या घटनेची चौकशी केली असता, कोणतीही ठोस माहिती समोर आली नाही. हा प्रकार कोणीतरी जाणूनबुजून धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने केला असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.या प्रकरणी बाबासाहेब जपे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...