spot_img
ब्रेकिंगवाल्मिक कराडचा पाय खोलात; रात्री नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

वाल्मिक कराडचा पाय खोलात; रात्री नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

spot_img

बीड / नगर सह्याद्री –

Walmik Karad Sent to Police Custody: गेल्या तीन आठवड्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात एका व्यक्तीचं नाव प्रचंड चर्चेत आलं आहे. सध्या केज पोलिसांच्या अटकेत असणारी आणि १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली ती व्यक्ती म्हणजे वाल्मिक कराड. बीडच्या मस्साजोगमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. यामध्ये हात असल्याचा आरोप असणाऱ्यांच्या यादीत वाल्मिक कराडचं नाव सर्वात वर घेतलं जात आहे. घटना घडल्यापासून विरोधकांनी त्यावरून रान उठवलं आहे. अर्थात, स्वत: वाल्मिक कराडनं सगळे आरोप फेटाळले असले, तरी न्यायालयात घडलेल्या युक्तिवादानंतर त्याची १४ दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

वाल्मिक कराडनं मंगळवारी दुपारी अचानक एक व्हिडीओ जारी केला. या व्हिडीओमध्ये त्याच्यावरील सर्व आरोप त्यानं फेटाळून लावले. तसेच, दाखल करण्यात आलेला खंडणीचा गुन्हाही अमान्य असल्याचं त्यानं नमूद केलं. आणि पुढच्या तासाभरात तो पुण्यात सीआयडी पोलिसांच्या स्वाधीन झाला. तो शरण येईपर्यंत त्याला अटक करता न येणं हे पोलिसांचं आणि पर्यायाने शासनकर्त्यांचं अपयश असल्याची टीका विरोधकांकडून करण्यात येत आहे. तसेच, त्याचं शेवटचं लोकेशन १७ नोव्हेंबरला पुण्यातलंच होतं आणि तो पुण्यातच शरण आला म्हणजे इतके दिवस तो पुण्यातच होता, तरी त्याला अटक न होणं हे पोलीस यंत्रणा ‘कॉम्प्रोमाईज्ड’ असल्याचं चिन्ह असल्याची टीका अंजली दमानिया यांनी केली आहे.

काय झालंय न्यायालयात?
वाल्मिक कराड मंगळवारी दुपारी स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन झाल्यानंतर संध्याकाळी त्याला पुणे पोलिसांनी केज पोलिसांच्या हवाली केलं. तिथे त्याला संध्याकाळी उशीरा न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयात दोन्ही बाजूच्या वकिलांनी जोरकसपणे युक्तिवाद केला. वाल्मिक कराडच्या पोलीस कोठडीसाठी सरकारी पक्षाच्या वकिलांनी वेगवेगळ्या बाजू मांडल्या. पण त्याचवेळी, सर्व आरोप फेटाळून कोठडी दिली जाऊ नये, असा युक्तिवाद वाल्मिक कराडच्या वकिलांनी केला. केज न्यायालयात न्यायमूर्ती एस. व्ही. पावसकर यांच्यासमोर यासंदर्भातली सुनावणी झाली. यावेळी वाल्मिक कराडकडून अशोक कवडे यांनी तर सरकारी पक्षाकडून वकील देशपांडे यांनी युक्तिवाद केला.

पोलीस कोठडीसाठी काय केला युक्तिवाद?
सरकारी पक्षाकडून वाल्मिक कराडच्या पोलीस कोठडीसाठी या प्रकरणाशी निगडित काही मुद्दे मांडण्यात आले. सुरुवातीलाच कराडच्या पोलीस कोठडीची मागणी केली. या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले हा वाल्मिक कराडच्याच सांगण्यावरून काम करत होता, असा मुद्दा सरकारी वकिलांनी उपस्थित केला. तसेच, यावेळी न्यायालयात सरकारी पक्षानं १९९९ सालापासून वाल्मिक कराडचं नाव आलेल्या गुन्ह्यांची यादीच न्यायालयासमोर सादर केली. अशा कृत्यांमधून तो दहशत पसरवत होता, असाही युक्तिवाद वकिलांनी केला.

मोबाईल रेकॉर्डिंगमधील संभाषणाची तपासणी
दरम्यान, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांच्या हाती लागलेल्या मोबाईल रेकॉर्डिंगमधील आवाज वाल्मिक कराडचाच आहे का? याची तपासणी करायची असल्याचं सरकारी पक्षानं न्यायालयाला सांगितलं. त्याशिवाय, वाल्मिक कराडविरोधात गुन्हा दाखल असलेलं खंडणीचं प्रकरण आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण यांचा काही संबंध आहे का? याचाही तपास करायचा असल्याची विनंती न्यायालयाला करण्यात आली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने वाल्मिक कराडची १४ दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वेसर्वा शांताराम मामा लंके यांचे निधन

निघोज / नगर सह्याद्री : कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वेसर्वा, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कार्याध्यक्ष...

‘लाडकी बहीण’वरून लाडक्या बहिणी भिडल्या; कोण काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री - महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत...

लाच स्वीकारताना तलाठी अडकला जाळ्यात; नगरमध्ये कुठे घडला प्रकार पहा…

कोपरगाव | नगर सह्याद्री सदनिकेच्या खरेदीखताची नोंद सातबारा उतार्‍यावर करून देण्यासाठी साडेसहा हजार रुपयांची लाच...

चाईल्ड पोर्नोग्राफी व्हिडीओ व्हायरल करणे भोवले; काय घडलं पहा

चार इंस्टाग्रामधारकांवर गुन्हा दाखल अहिल्यानगर | नगर सह्याद्री लहान मुलांच्या लैंगिक शोषणाबाबतचे (चाईल्ड पोर्नोग्राफी) व्हिडीओ सोशल...