Maharashtra politics: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विजय मिळवलेल्या 10 उमेदवारांची बैठक मुंबईतील कार्यालयात आयोजित करण्यात आली. या बैठकीत गटनेतेपद, मुख्य प्रतोदपद आणि प्रतोदपद याबाबत निर्णय घेण्यात आले. सर्वात कमी वयात आमदार झालेले रोहित आर. आर. पाटील यांची मुख्य प्रतोदपदी निवड झाली आहे
गटनेतेपदी मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची निवड झाली आहे. मुख्य प्रतोदपदी तासगाव- कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघाचे युवा आमदार रोहित आर. आर. पाटील, तर प्रतोदपदी माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्तम जाणकर यांची करण्यात आली आहे.
सर्वात कमी वयात आमदार झालेले रोहित आर. आर. पाटील यांची मुख्य प्रतोदपदी निवड झाली आहे. बैठकीला नवनिर्वाचित नऊ आमदार उपस्थित होते, तर बीड विधानसभा मतदारसंघाचे आमदार संदीप क्षीरसागर त्यांचे मतदारसंघातील कार्यक्रमामुळे अनुपस्थित होते. या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत या निवडींची घोषणा केली.