मुंबई । नगर सहयाद्री:-
ओटीटी प्लॅटफॉर्म ऍमेझॉन प्राइम व्हिडिओवर सुरू झालेला करण जोहर यांचा रिअॅलिटी शो ‘द ट्रेटर्स’ याचा पहिला सिझन नुकताच संपला असून, या शोच्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. उर्फी जावेद आणि निकिता लूथर या दोघी स्पर्धकांनी शेवटच्या टप्प्यात बाजी मारत ट्रॉफी जिंकली आहे. शोच्या अंतिम भागात उर्फी आणि निकिता यांनी आपल्या युक्ती, संयम आणि स्मार्ट गेमप्लेमुळे इतर स्पर्धकांना मागे टाकत विजेतेपद मिळवले.
विशेष म्हणजे, या दोघींना एकत्रितपणे १ कोटी रुपयांचे बक्षीस आणि विजेतेपदाची ट्रॉफी प्रदान करण्यात आली आहे. शोच्या सुरुवातीपासूनच उर्फी जावेद चर्चेचा विषय ठरली होती. तिचा आत्मविश्वास आणि रणनीती सर्वांनाच भावली. याशिवाय, निकिता लूथर हिची खेळी देखील तितकीच प्रभावी ठरली.
दुसरीकडे, अपूर्वा मुखिजा आणि हर्ष गुजराल यांच्यासारख्या लोकप्रिय स्पर्धकांनाही अंतिम विजेतेपद मिळवता आले नाही. ‘द ट्रेटर्स’चा हा पहिला सिझन प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरला आहे. करण जोहरने यामध्ये होस्टच्या भूमिकेतून आपली उपस्थिती लक्षणीय ठरवली. आता लवकरच या शोच्या दुसऱ्या सिझनबाबत चर्चा सुरू झाली आहे.