spot_img
अहमदनगरअर्बन बँकेत कोट्यवधींची थकबाकी? कर्जदारांसाठी परतफेड करण्याची 'ती' योजना सुरू; जाणून घ्या...

अर्बन बँकेत कोट्यवधींची थकबाकी? कर्जदारांसाठी परतफेड करण्याची ‘ती’ योजना सुरू; जाणून घ्या सविस्तर..

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री
नगर अर्बन बँकेला वन टाईम सेटलमेंट योजना राबविण्यास केंद्रीय निबंधक कार्यालयाची परवानगी मिळाली असल्याची माहिती बँकेचे ज्येष्ठ सभासद राजेंद्र चोपडा यांनी दिली. जास्तीत जास्त कर्जदारांनी या योजनेचा लाभ घेऊन कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

याबाबत माहिती देताना चोपडा म्हणाले, नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेच्या थकबाकीदार, कर्जदारांना वन टाईम सेटलमेंट योजनेचा लाभ देण्यास केंद्रीय सहकार निबंधक विभागाने परवानगी दिली आहे. यासाठी माझ्यासह बँक बचाव समितीने यासाठी पाठपुरावा केला होता.

आता कर्ज थकबाकी असलेल्यांना या योजनेमुळे संभाव्य कायदेशीर कारवाई टाळता येणार आहे. तसेच थकबाकी जमा झाल्याने बँकेलाही ठेवीदारांच्या ठेवी परत देणे सुलभ होईल. जास्तीत जास्त कर्जदारांनी या योजनेतून कर्ज परतफेड करावी, असे आवाहन चोपडा यांनी केले आहे. नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेची कोट्यवधींची थकबाकी, तत्कालीन काही संचालक व काही अधिकार्यांनी केलेला गैरकारभार यामुळे रिझर्व्ह बँकेने बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे. सध्या बँकेवर अवसायक नियुक्त आहेत.

कर्ज वसुलीला वेग मिळावा यासाठी केंद्रीय निबंधक कार्यालयाकडे वन टाईम सेटलमेंट योजनेची मागणी केली होती. त्यास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे कर्जदारांनी बँकेच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधून कर्ज थकबाकी जमा करावी. त्यामुळे भविष्यातील कायदेशीर कारवाई टळू शकते. तसेच सर्वसामान्य ठेवीदारांनाही त्यांचे हक्काचे पैसे परत मिळण्यास मदत होणार आहे, असेही चोपडा यांनी स्पष्ट केले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कुकडीचे आवर्तन तातडीने सोडा; कोणी केली मागणी पहा…

माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र म्हस्के यांचे उपोषण सुरू श्रीगोंदा | नगर सह्याद्री कुकडीच्या सल्लागार समितीची...

कर्जत नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार, आता काय घडलं पहा

उच्च न्यायालयाकडून कारणे दाखवा नोटीस , गटनेता बदलण्याचा प्रस्ताव पुन्हा कोर्टात कर्जत | नगर सह्याद्री कर्जत...

जिल्ह्यात अवैध धंद्यांवर संक्रात; इतक्या ठिकाणी रेड, पहा सविस्तर

विविध ३३ गुन्ह्यांत पाच लाख ९४ हजारांचा मुद्देमाल जप्त अहिल्यानगर | नगर सह्याद्री जिल्हा पोलीस अधीक्षक...

संगमनेरचे राजकीय वातावरण बिघडले; थोरातांचा मंत्री विखेंवर निशाणा, काय म्हणाले पहा

संगमनेर | नगर सह्याद्री तालुक्यात सध्या राजकीय वातावरणात घडत असलेल्या बदलांमुळे एक प्रकारची दहशतीची भावना...