spot_img
अहमदनगरAhmednagar: अर्बन बँक घोटाळा प्रकरण! गांधी दाम्पत्याचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने...

Ahmednagar: अर्बन बँक घोटाळा प्रकरण! गांधी दाम्पत्याचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने…

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री
नगर अर्बन बँकेतील कर्ज फसवणूक व कर्ज घोटाळा प्रकरणात अटकपूर्व जामीनासाठी देवेंद्र दिलीप गांधी आणि त्यांच्या पत्नी प्रगती देवेंद्र गांधी यांंनी न्यायालयात अर्ज दाखल केले होते. त्यांचे जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश पी. आर. सित्रे यांनी नामंजूर केले आहे. दरम्यान अटकेत असलेल्या संगमनेर येथील उद्योजक अमित वल्लभराय पंडित याचा जामीन अर्ज देखील न्यायाधीश सित्रे यांनी नामंजूर केला आहे.

आर्थिक गुन्हे शाखेकडून अर्बन बँक घोटाळ्याचा तपास सुरू आहे. अटकेत असलेल्या कर्जदार व बँकेच्या अधिकार्‍यांनी जामीनासाठी न्यायालयात अर्ज सादर केले आहेत. तसेच, या व्यतिरिक्त काही जणांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केले आहेत. फॉरेन्सिक ऑडिटमध्ये ठपका असलेल्या १०५ जणांची यादी लिक झाल्यानंतर अनेक संशयित पसार झाले आहेत. त्यातील काहींसह ज्यांची या यादीत नावे नाहीत अशांनीही अटकपूर्व जामीन अर्जासाठी न्यायालयात धाव घेतली आहे.

अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करणार्‍यांमध्ये देवेंद्र दिलीप गांधी आणि त्यांच्या पत्नी प्रगती देवेंद्र गांधी यांचा समावेश होता. त्यावर बँक बचाव समिती व ठेवीदारांच्या वतीने स्वतंत्रपणे बाजू मांडण्यात आली. न्यायाधीश सित्रे यांनी गांधी पती- पत्नीचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला आहे. तर अटकेतील पंडित याचाही जामीन अर्ज नामंजूर करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

माझे सर्वस्व व नेतृत्व विखे कुटुंब : पै. युवराज पठारे

माझे सर्वस्व व नेतृत्व विखे कुटुंब : पै. युवराज पठारे काशिनाथ दाते यांना पारनेर शहरातून...

विखे पाटलांचा थोरातांवर हल्लाबोल ; काय म्हणाले पहा…

संगमनेर / नगर सह्याद्री अनेक वर्षापासून मंत्रिपद असतानाही आपण काही करू शकलो नाही याचे शल्‍य...

केंद्रीयमंत्री गडकरींचे पुन्हा एकदा बेधडक वक्तव्य; नेमकं काय म्हणाले पहा…

मुंबई / नगर सह्याद्री - भाजपचा विस्तार झपाट्याने होत आहे. पीक वाढले की त्यासोबत रोगही...

शरद पवारांचा सरकारला ”दे धक्का”; मविआत पवार निर्याणक भूमिकेत?, पवारांच्या डोक्यात नेमकं काय…

मुंबई / नगर सह्याद्री लोकसभा निवडणुकीत भावनिक आणि मुद्द्यांचे राजकारण महाविकास आघाडीला फायद्याचे ठरलं...