spot_img
अहमदनगरअर्बन बँक प्रकरण; आज काय घडलं? वाचा सविस्तर

अर्बन बँक प्रकरण; आज काय घडलं? वाचा सविस्तर

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री:-
नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणात संशयितांच्या तपासणीसाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी दुपारी माजी खासदार स्व. दिलीप गांधी यांच्या घरी झाडाझडती घेतली. माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचा संशय आहे. त्यांच्या शोधासाठी ही झडती घेण्यात आली. मात्र, ते घरात आढळून आले नसल्याचे उपअधीक्षक अमोल भारती यांनी सांगितले.

आर्थिक गुन्हे शाखेमार्फत अर्बन बँक कर्ज घोटाळ्याचा तपास सुरू आहे. सुमारे २९१ कोटींचा गैरव्यवहार उघडकीस आलेला असून फॉरेन्सिक ऑडिटमध्ये संशयितांच्या नावाने झालेल्या व्यवहाराची माहिती समोर आलेली आहे. या पार्श्वभूमीवर संशयितांची चौकशी व त्यांच्यावर कारवाई सुरू आहे.

शुक्रवारी गांधी यांच्या घरी काही सदस्य आल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यामुळे सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांनी पथकासह जाऊन घरात झडती घेतली. मात्र, ते आढळून आले नाहीत. दरम्यान, पथकाने घरात संपूर्ण तपासणी केली असून यात संशयित आढळून आले नसल्याचे उपअधीक्षक भारती यांनी सांगितले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये ग्राम महसुल अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

  अहिल्यानगर/प्रतिनिधी : पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण (ता. नगर) येथील ग्राम महसुल अधिकारी दिपक साठे यास लाचलुचपत...

आता मराठ्यांचं वादळं दिल्लीत धडकणार, जरांगे पाटलांची थेट घोषणा, समोर आलं मोठं कारण

नगर सह्याद्री वेब टीम - मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज...

प्रवाशांनो लक्ष द्या! आता बीडहून अहिल्यानगरकडे रेल्वेगाडी धावणार; कुणाच्या हस्ते झाले उदघाटन?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अनेक दशकांपासून बीडवासीयांचे स्वप्न असलेली रेल्वे अखेर वास्तवात उतरली आहे....

आमदारांची ॲक्शन, पोलिसांची रिॲक्शन; रस्त्यावर गोमांस फेकणाऱ्या आरोपीला सहा तासात बेड्या

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील कोठला भागात मंगळवारी सायंकाळी रस्त्यावर गोमांस टाकल्याचे निदर्शनास आल्यावर...