spot_img
अहमदनगरAhmednagar: अर्बन बँक प्रकरण: अटकेचा धडका सुरू, आज 'दोन' गजाआड

Ahmednagar: अर्बन बँक प्रकरण: अटकेचा धडका सुरू, आज ‘दोन’ गजाआड

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
Urban Bank case: नगर अर्बन बँकेच्या कर्ज घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी आणखी दोघांना अटक केली आहे. मुख्य कर्ज तपासणी अधिकारी मनोज वसंतलाल फिरोदिया (रा. सारसनगर) व कर्जदार प्रवीण सुरेश लहारे (रा. केडगाव) अशी त्यांची नावे आहेत.

मागील बुधवारी अटक केलेला सीए शंकर घनशामदास अंदानी याच्या पोलीस कोठडीची मुदत मंगळवारी संपल्याने त्याला न्यायालयासमोर हजर केले होते. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे. नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरणात संशयितांना अटक करण्याचा धडका सुरू आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे.

अलिकडच्या काळात बँकेचा माजी अध्यक्ष अशोक कटारिया, माजी संचालक मनेष साठे व अनिल कोठारी तसेच अधिकारी प्रदीप पाटील व राजेंद्र लुणिया यांना अटक केली आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांच्या चौकशीतून घोटाळ्यातील नवनवीन खुलासे समोर आले आहेत. बँकेचा मुख्य कर्ज तपासणी अधिकारी फिरोदिया मंगळवारी बँकेच्या मुख्य शाखेत आल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्याला तेथून अटक केली आहे.

बँकेकडे येणार्‍या कर्ज प्रकरणाच्या फाईलची तपासणी करून कर्ज प्रकरण मंजूर करण्याचे कामे तो करत होता. त्याच्याकडे पोलीस चौकशी करणार आहेत. तसेच लहारे एंटरप्रायजेसचा प्रवीण लहारे केडगाव उपनगरात असताना त्याला अटक केली. त्याने बनावट कागदपत्रे तयार करून एकाच दिवसात अडीच कोटींचे कर्ज घेतल्याचे तपासातून समोर आले आहे.

पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस अंमलदार गाडीलकर, जंबे, योगेश घोडके, क्षीरसागर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खळबळजनक! पुण्यात प्रसिद्ध प्रसिद्ध अभिनेत्याला अटक; बाथरूममध्ये केला लैंगिक अत्याचार?

Ashish Kapoor : मनोरंजन विश्वात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेता...

नगर-मनमाड महामार्गावर अपघात; अहिल्यानगरचे सेवानिवृत्त शिक्षक ठार

Accident News: नगर-मनमाड महामार्गावर लागोपाठ दोन दिवसांत तीन अपघात झाले आहे. काल सायंकाळी साडेसात...

सरकारी कामात मिळणार यश, प्रगतीची संधी; आर्थिक लाभ वाचा, आजचे राशि भविष्य..

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य तुमची प्रिय व्यक्ती वैतागल्यामुळे - तुमच्या मनावर...

मराठा आरक्षणाचा GR फाडला, OBC नेते आक्रमक, आता राज्यव्यापी आंदोलन

पुणे / नगर सह्याद्री - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी मुंबईतील आझाद मैदानावर...