spot_img
ब्रेकिंगयुपीआय सेवा डाऊन! महिन्यात दुसरी वेळ, कारण काय?

युपीआय सेवा डाऊन! महिन्यात दुसरी वेळ, कारण काय?

spot_img

नवी दिल्ली | वृत्तसंस्था
देशभरात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (युपीआय) सेवा पुन्हा एकदा बंद पडली आहे. गेल्या दीड तासापासून नागरिकांना यूपीआयद्वारे व्यवहार करताना अडचणी येत आहेत. ही समस्या गेल्या एका महिन्यात दुसऱ्यांदा उद्भवली आहे.

डाउनडिटेक्टरनुसार, जवळपास 68% वापरकर्त्यांना पेमेंट करताना त्रास होत आहे, तर 31% लोकांना निधी ट्रान्सफर करण्यात अडचण येत आहे. सुमारे 1% नागरिकांना खरेदी करताना अडथळे येत आहेत. यापूव 26 मार्च रोजी सुद्धा यूपीआय सेवा सुमारे अडीच तास ठप्प झाली होती. त्यावेळी गुगल पे, फोनपे, पेटीएमसारख्या ॲप्सवर व्यवहार अयशस्वी होत होते. तसेच, 10 पेक्षा अधिक बँकांच्या यूपीआय आणि नेट बँकिंग सेवांवर परिणाम झाला होता.

अनेक वापरकर्ते ॲप लॉगिन आणि नेट बँकिंग प्रवेशही करू शकले नव्हते.नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ने याप्रसंगी स्पष्टीकरण दिले होते की, काही तांत्रिक कारणांमुळे यूपीआय सेवांमध्ये अंशतः अडथळा निर्माण झाला होता. मात्र, समस्या तातडीने सोडवून सेवा पूर्ववत करण्यात आली होती. सध्या सुरू असलेल्या अडचणींबाबत अधिकृत प्रतिक्रिया अद्याप मिळालेली नाही. वापरकर्त्यांनी संयम ठेवावा, अशी सूचना करण्यात येत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगरमध्ये बंद घर फोडले; अडीच लाखांचे दागिने लांबविले

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - श्रीकृष्णनगर, केडगाव येथील प्लॉट क्रमांक ३० येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी...

धक्कादायक; बँक कर्मचार्‍याने १२ तोळे सोने लांबविले, कुठे घडला प्रकार पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : नगरमध्ये बँक कर्मचार्‍यांने १२ तोळे सोने लंपास केल्याची प्रकार उघडकीस...

दोन लेकरांसह आईची विहिरीत उडी; तिघांचाही मृत्यू, नगरमधील घटना

जामखेड तालुक्यातील नायगाव येथील धक्कादायक घटना जामखेड | नगर सह्याद्री रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी जामखेड तालुयातील नायगाव...

बोगस मतदारांच्या आरोपावरून विखे-थोरात भिडले, काय म्हणाले पहा

शिर्डी | नगर सह्याद्री बोगस मतदानाबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले...