पदाधिकार्यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती | सुजित झावरे पाटील यांचा शिवसेत पक्षप्रवेश
पारनेर / नगर सह्याद्री –
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु असून जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांचा प्रवेश हा निर्णायक टप्पा मानला जात आहे. गुरुवार, दि. ६ नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सुजित झावरे पाटील यांचा शिवसेनेमध्ये अधिकृत प्रवेश होणार आहे. या निमित्ताने पारनेर-सुपा रस्त्यावरील मैदानावर दुपारी दोन वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, जिल्हाभरातून हजारो शिवसैनिक या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली.
या पार्श्वभूमीवर पारनेर येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, शिवसेना पदाधिकारी बाबूशेठ टायरवाले यांच्या उपस्थितीत संभाजी कदम, सुजित झावरे पाटील, सचिन जाधव, योगेश रोकडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी कदम म्हणाले, शिवसेना ही नगर दक्षिणेतील जनतेच्या मनात रुजलेली संघटना आहे. फुटीनंतरही शिवसैनिकांनी आपला आत्मविश्वास सोडला नाही. आता झावरे पाटलांच्या नेतृत्वामुळे आम्ही संघटनेला नव्या दमाने उभारणार आहोत.
सुजित झावरे पाटलांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला ग्रामीण भागात पुन्हा बळ मिळणार असून, संघटनेला संघटीत दिशा देणारे नेतृत्व मिळाले आहे. शिवसैनिकांत नवचैतन्य निर्माण झाले असून, पारनेरपासून नगरपर्यंत धनुष्यबाण पुन्हा उंचावण्याची तयारी सुरू झाली आहे.
नगर दक्षिणेत शिवसेनेच्या संघटनेला नवसंजीवनी मिळणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त करताना शिवसेनेचे नगर शहर जिल्हाध्यक्ष संभाजी कदम म्हणाले. सुजित पाटलांच्या रूपाने शिवसेनेला एक उमदा, जनतेशी नाळ जुळवणारा, तरुण आणि दांडगा सेनापती मिळाला आहे. या नेतृत्वामुळे संघटनेची ताकद वाढेलच, पण हिंदुत्वाच्या विचारधारेतून पुन्हा एकदा नगर जिल्हा भगवामय होईल.
पारनेर येथे शिवसेनेच्या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सुजितराव झावरे पाटील यांच्या वतीने शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब माळी, युवा नेते स्वप्निल राहींज, खरेदी-विक्री संघाचे संचालक सतीश पिंपरकर, सुरेश पठारे, संदीप कपाळे, सबाजी येवले, साहेबराव नरसाळे, संभाजी शेरकर, नंदू कदम, सचिन भनगडे, बाजीराव ठोकळ, उद्योजक लहू जाधव, माजी उपसरपंच शंकर बर्वे, शिक्षक नेते प्रवीण झावरे, युवा नेते सचिन सैद, सरपंच पोपटराव झावरे, चेअरमन सूर्यभान भालेकर, विलासराव साठे सर, सामाजिक कार्यकर्ते गणेश शिरतार, उद्योजक विशाल तळेकर, सुमित औटी, कैलास सैद, संदीप दाते, यांच्या वतीने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आम्हीही स्वबळावर लढण्यास तयार
महायुतीच्या माध्यमातून आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रितपणे लढवू. परंतु घटकपक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतल्यास आम्हीही स्वबळावर उतरायला तयार आहोत. मात्र पक्षाचा आदेश सर्वोच्च राहील; आम्ही संघटनेच्या निर्णयाप्रमाणेच पाऊल उचलू.
सुजित झावरे पाटील
माजी उपाध्यक्ष, जि. प. अहिल्यानगर



