spot_img
ब्रेकिंगबळीराजावर अवकाळी संकट; दोघांचा बळी | ३५ गावांना तडाखा

बळीराजावर अवकाळी संकट; दोघांचा बळी | ३५ गावांना तडाखा

spot_img

अहिल्यानगर | नगर सह्याद्री

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे बळीराजावर अवकाळी संकट ओढावले असून कांदा व फळ पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान भारतीय हवामान खात्याने पुन्हा पावसाचा इशारा दिल्याने शेतकरी चिंचेत सापडला आहे.

जिल्ह्यात ९ ते १२ मे या कालावधीत अवकाळीसह वादळाच्या तडाख्यामुळे पाथर्डी, अकोले आणि नगर तालुयातील ३५ गावांत शेती पिकांचे नुकसान झाले आहे. यासह गेल्या दीड महिन्यात वीज व झाड पडून दोन जणांचे बळी गेले असून तीन जनावरांसह आठ घरांची पडझड झाली असल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.
यंदा जिल्ह्यात वादळाच्या तडाख्यासह टप्प्याटप्प्याने अवकळी, गारपीट व वादळाचा कहर सुरू आहे. एप्रिल महिन्यात तीन वेगवेगळ्या दिवशी अवकाळीचा फटका शेतकर्‍यांना बसला होता. त्यानंतर आता मे महिन्यात देखील अवकाळीचा कहर सुरू असून शेती  नुकसानीचा आकडा वाढताना दिसत आहे. जिल्ह्यात ९ ते १२ मे या कालावधीत पाथर्डी, अकोले आणि नगर तालुयात ३५ गावांतील २५० शेतकर्‍यांची ११५.५५ पिकांचे नुकसान झालेले आहे. यात १८३ शेतकर्‍याचे ७० हेटरवर ३३ टक्क्यांपेक्षा कमी तर ६७ शेतकर्‍यांचे ४५.५५ हेटर वर नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने तयार केला आहे.

जिल्ह्यात पुढील काही दिवसांत अवकाळीसह मान्सूनपूर्व पावसाचा मुक्काम राहणार असून, यामुळे शेतकर्‍यांनी पिकांसह पशुधन याची काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्ह्यात ९ ते १२ मे यादरम्यान वादळ सर्वाधिक तडाखा पाथर्डी तालुयातील २४ गावांना बसला असून या ठिकाणच्या १०६ शेतकर्‍यांचे ७३.६० हेटर वरील पिकांचे नुकसान झालेले आहे. यासह अकोले तालुयातील सहा गावात ७३ शेतकर्‍यांची १८.३५ हेटर वरील पिकांची नुकसान झालेले असून नगर तालुयातील पाच शेतकर्‍यांची पाच हेटर वरील पिकांचे नुकसान झालेले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पाच हजारांहून अधिक हेटर वरील पिकांना वादळाचा तडाखा बसलेला असून नुकसान झालेल्या पिकाची पंचनामे करून जिल्हा प्रशासनाला अहवाल सादर करण्यात आल्याचे कृषी विभागाकडून कळविण्यात आले आहे.

कांदा भिजला, फळे कोसळली
गेल्या आठ दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे पारनेर, अहिल्यानगर तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकर्‍यांना मोठा फटका बसला. अनेक शेतकर्‍यांचा कांदा भिजला. तर अनेक ठिकाणी गारांचा पाऊस झाला. त्यामुळे फळपिकांना मोठा फटका बसला. अगोदरच सध्या कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकर्‍यांनी कांदा ऐरणीमध्ये साठवूण ठेवण्याचे काम सुरु आहे. त्यातच सोसाट्यांच्या वार्‍यासह झालेल्या पावसाने आंबा, डाळिंब, मोसंबी, चिकू, मका, कांदा, उन्हाळी बाजरी, मिरची, केळी या पिकांसह फळ बागांचे मोठे नुकसान झाले.
संगमनेरमध्ये दहशत वाढली

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहमदनगर नव्हे आता अहिल्यानगर रेल्वेस्थानक, रेल्वेस्टेशनचेही नाव बदलले, सरकारकडून प्रक्रिया पूर्ण

अहिल्यानगर / नगर सह्याद्री : अहिल्यानगरचे नामांतर केल्यानंतर आता रेल्वेस्थानकाच्या नामांतराचीही प्रक्रिया पूर्ण झाली आहे....

तयारीला लागा! जिल्हा परिषद अध्यक्ष पदांच्या आरक्षणाचा फुगा फुटला, अनेक दिग्गजांना मोठा धक्का, कुठे काय निघाले आरक्षण पहा

अहिल्यानगर झेडपीचे अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव / जिल्ह्यातील दिग्गजांना मोठा धक्का | राज्यातील...

एसईबीसी, ईडब्लूएस, ओपन आरक्षण नको का?; मंत्री छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले पहा

मराठा समाजाला सवाल | नेत्यांनाही धरले धारेवर नाशिक | नगर सह्याद्री राज्यातील मराठा समाजाला आतापर्यंत त्यांच्यासाठी...

धक्कादायक! हायकोर्ट बॉम्बने उडवण्याची धमकी, दिल्ली, मुंबईत खळबळ

नवी दिल्ली | वृत्तसंस्था दिल्लीतील नामांकित शाळा बॉम्बस्फोट करून उडवून देण्याची धमकी ताजी असतानाच आता...