spot_img
अहमदनगरअवकाळीने फळबागा उद्ध्वस्त; झाडांची इमारत डोळ्यासमोर कोलमडली..; नगर तालुक्यातील शेतकऱ्यांची हृदयद्रावक कहाणी

अवकाळीने फळबागा उद्ध्वस्त; झाडांची इमारत डोळ्यासमोर कोलमडली..; नगर तालुक्यातील शेतकऱ्यांची हृदयद्रावक कहाणी

spot_img

सुनिल चोभे | नगर सह्याद्री
काबाडकष्ट करुन फळबागा जोपासल्या… उन्हाळ्यात विकतचे पाणी घालून जगवल्या.. वर्षभर मेहनत केली. परंतु, अहिल्यानगर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे सारेच कष्ट पाण्यात गेले. आंबा, डाळिंब, संत्रा, केळी अशा फळबागा जोरदार वारे व अवकाळी पावसाने उन्मळून पडल्या. मृग बहारही गळून गेला. तळहातावरील फोडाप्रमाणे सांभाळलेली फळबाग अवकाळी पावसाने डोळ्या समोर अक्षरशः भुईसमापाट झाल्याचे व्यथित मनाने अहिल्यानगर तालुक्यातील शेतकरी सांगताहेत.

अहिल्यानगर तालुक्यात तीन हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर फळबागा आहेत आहेत. त्यात संत्रा, आंबा, डाळिंब,पेरू, चिकू, मोसंबी, लिंबू, नारळ, चिंच, सीताफळ, अंजिर, आवळ्याचा समावेश आहे. एक हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर संत्र्यांची लागवड करण्यात आली आहे. तालुक्यातील खडकी, खंडाळा, वाळकी, पिंपळगाव माळवी, पिंपळगाव उज्जैनी, देऊळगाव सिद्धी, सारोळा कासार, बाबुड बेंद आदी भागात संत्र्याच्या बागा मोठ्या प्रमाणात आहेत. खडकी, वाळकी, देऊळगाव सिद्धी, सारोळा कासार या पट्ट्यात जवळपास 500 हेक्टरवर संत्र्यासह विविध फळबागा आहेत. कमी पाऊस झाल्यास उन्हाळ्यात फळबागांना विकतचे पाणी घालून शेतकरी त्या जगवतात. डाळिंब, सीताफळाचे उत्पादन दोन तीन वर्षांनंतर सुरू होते. संत्रा, चिकू, आंबा, पेरूचे उत्पादन तीन-चार वर्षांनंतर सुरु होते.

विकतचे पाणी घातून, काबाडकष्ट करून फळबागा जोपासल्या; परंतु अहिल्यानगर तालुक्यात मंगळवारी झालेल्या ढगफुटीसदृश अवकाळी पावसाने फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. मृग बहारही गळून गेला आहे. तालुक्यातील सुमारे 45 गावांतील अडीच हजार हेक्टरवरील पिकांना मोठा फटका बसला आहे. अगोदरच कांद्याला बाजार भाव नाही. त्यात पावसाने कांदा भिजल्याने आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी पुन्हा फळबागा भुईसपाट झाल्याने दुहेरी संकटात सापडला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले असून एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नसल्याचे सांगितले आहे. परंतु, सरकारकडून तातडीने नुकसान भरपाईची मदत मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.

पावसाने झाडे उन्मळून पडली, बहारही गेला गळून
गेल्या आठ-दहा वर्षांपासून फळबाग जोपासली आहे. पाणी टंचाईच्या काळात विकत पाणी घालून जगवली. लाखो रुपये खर्च केला. सध्या संत्र्याची 2800 ते तीन हजार झाडे आहेत. दरवष 30 ते 35 लाख रुपये फळझाडांचे होतात. परंतु मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसाने संत्र्याची झाडेच उन्मळून पडली आहेत. पावसाळ्यापूव झाडे बहार येण्यासाठी तावाला सोडली होती. पावसामुळे बहारही फुटला होता. तो बहारही अवकाळी पावसाने गळून गेला आहे. त्यामुळे प्रचंड नुकसान झाले असल्याची प्रतिक्रिया अहिल्यानगर तालुक्यातील खडकी येथील शेतकरी अप्पा कोठुळे यांनी ‘नगर सह्याद्री’ शी बोलताना दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खडीमाफिया दत्तात्रय शेळके म्हणतो, कलेक्टर अन्‌‍ पोलीस माझ्या खिशात!

अकोले तहसीलदारांनी वहिवाट रस्ता मंजूर केला, बेलापूरच्या खडी क्रशरवाल्याने उखडून टाकला! 10 लाख खर्चून तयार...

‘सिस्पे’, साकळाई योजनेबद्दल विखे पाटलांचे मोठे विधान, जनतेच्या पैशाची जबाबदारी ‘त्या’ लोकप्रतिनिधीची

पद्मश्रींच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ नागरिकांना सन्मान; शेतकरी दिनाच्या घोषणेसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचे डॉ. सुजय विखे...

आझाद ठुबे यांच्या राजे शिवाजी पतसंस्थेत 67 कोटींचा घोटाळा

अपहाराशी संबंधित 40 घोटाळेबहाद्दरांसह सहा कर्मचारी दोषी पारनेर | नगर सह्याद्री माजी जिल्हा परिषद सदस्य आझाद...

गणेश मंडळांना मिळणार एका क्लिकवर परवानगी; आयुक्त डांगे यांनी दिली माहिती, पहा लिंक..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री गणेशोत्सवात व इतर सण-उत्सव काळात मंडप उभारणी, स्वागत कमानी, रनिंग मंडपसाठी...