spot_img
अहमदनगरअवकाळी पावसाचा वीटभट्टी व्यवसायाला फटका! नुकसानभरपाईपासून व्यावसाईक वंचित वीटभट्टी व्यवसायिकांचेही मोठे...

अवकाळी पावसाचा वीटभट्टी व्यवसायाला फटका! नुकसानभरपाईपासून व्यावसाईक वंचित वीटभट्टी व्यवसायिकांचेही मोठे नुकसान मागणी

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री:-
पारनेर तालुक्याच्या उत्तर भागातील वडगाव सावताळ, वासुंदे, खडकवाडी, कासारे, वनकुटे, कामटवाडी आणि पोखरी या गावांमध्ये वीट व्यवसाय हा स्थानिक अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मात्र, सध्या अवकाळी पावसाने या व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वीट तयार करणाऱ्या शेतांमध्ये पाणी साचले असून, कच्च्या विटांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

यामुळे वीट व्यवसायिकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. या भागात वीट व्यवसायातून हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. पावसामुळे विटांचे उत्पादन ठप्प झाले असून, तयार विटांचा दर्जा खालावला आहे. याचा परिणाम बाजारपेठेतील मागणीवरही झाला आहे. स्थानिक व्यवसायिकांनी सांगितले की, अवकाळी पावसामुळे त्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. विटांचे उत्पादन, वाहतूक आणि विक्री यावरही मर्यादा आल्या आहेत.

काही व्यवसायिकांनी कर्ज काढून गुंतवणूक केली होती, परंतु नुकसानामुळे त्यांची परतफेड करण्याची क्षमता धोक्यात आली आहे.या संकटातून सावरण्यासाठी वीट व्यवसायिकांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. स्थानिक प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

अवकाळी पावसामुळे विटांचा दर्जा खालावला
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे आमच्या वीट भट्ट्यांमध्ये पाणी साचले आहे. कच्च्या विटांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, तयार विटांचा दर्जाही खालावला आहे. यामुळे आम्हाला लाखों रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे.
-अशोक खराबी (व्यवसायिक)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनपा प्रभाग रचनेबाबत महत्वाचे आदेश प्राप्त; सप्टेंबरला अंतिम प्रभाग रचना, असा आहे कार्यक्रम

सुनील चोभे | नगर सह्याद्री महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याचे आदेश नगर विकास विभागाने...

‌‘सेनापती बापट‌’ मध्ये गैरव्यवहार! चेअरमनसह संचालक मंडळावर गुन्हा दाखल

पारनेर | नगर सह्याद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील अळकुटी येथील 75 वषय शेतकरी आणि विमा...

नगर, श्रीगोंदा, शेवगाव,पाथर्डीत तुफान वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा

पिकांचे नुकसान | शेड, घराची पत्रे उडाली | जेऊर, चिचोंडी पाटील, खडकीत नुकसान अहिल्यानगर...

‌‘रयत‌’चे विध्यार्थी गिरवणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे धडे: चेअरमन चंद्रकांत दळवी

कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारीत शिक्षण देणारी राज्यातील पहिली शिक्षण संस्था ‌‘रयत‌’ ठरणार अहिल्यानगर | नगर सह्याद्री आर्टिफिशियल...