कर्जत । नगर सहयाद्री
कर्जत तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण उडाली. तालुक्यात सलग तीन ते चार दिवसांपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे. या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले. तालुक्यातील शेतकऱ्यांची केळी, कांदा, पेरू, आंबा, जांभूळ, डाळिंब या फळबागांना मोठा तडाखा बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांची लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील रुई गव्हाण, बाबुळगाव दुमाला, शिंपोरा, माळंगी, जलालपूर, ताजु, राक्षस वाडी बुद्रक, खेड, माही, राशीन, सिद्धटेक जलालपूर गणेशवाडी, आवटेवाडी या गावातील शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. गुरुवार दि (22 मे) रोजी कर्जत तालुक्यातील पाटेवाडी येथे दुपारी दोन वाजता जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. यावेळी गावातील प्राचीन भव्य पिंपळाचे झाड तीन दुकानांवर कोसळले. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही.
तालुक्यातील सिद्धटेक येथील देवई गिते यांच्या केळीची बाग संपूर्णपणे उध्वस्त झाली. या केळीच्या झाडांना भले मोठी केळीचे घड लगडले होते. मात्र जोरदार वादळी पावसामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. गणेश वाडीतील सुभाष बाबू मोरे यांची डाळिंबाची बाग याचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. जर आवटेवाडी येथील दादा मोरे यांच्या केळीचे बागेचे नुकसान झाले आहे.
रिघवान बाबुळगाव शिवपुरा परिसरामध्ये तब्बल पन्नास हेक्टर क्षेत्रामधील फळबागांचे नुकसान तर जलालपूर ताजु राक्षस वाडी परिसरामध्ये जवळपास दहा हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले आहे. तालुक्यातील राशीन माही परिसरामध्ये कांदा व जांभूळ याची मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे.
अहिल्यानगरध्ये कोसळधार; दोन दिवस यलो अलर्ट
नगर शहरासह जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी ददार मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली. तर शुक्रवार सकाळपासून जिल्हाभर कमी अधिक प्रमाणात कोसळधार सुरु आहे. दरम्यान 24 व 25 े रोजी जिल्ह्याला यलो अलर्ट दिला आहे. त्याुळे नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्ह्याच्या काही भागात गुरुवारी सायंकाळी दमदार पावसाने हजेरी लावली. तसेच 24 व 25 मे 2025 रोजी वीजांच्या कडकडाटांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान खात्याने शक्यता वर्तवली आहे. जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.