spot_img
अहमदनगरमालपाणी क्लब जलतरण तलावात अनोखा 'त्रिवेणी संगम'

मालपाणी क्लब जलतरण तलावात अनोखा ‘त्रिवेणी संगम’

spot_img

संगमनेर । नगर सहयाद्री:-
मालपाणी हेल्थ क्लबच्या जलतरण तलावात महाकुंभ मधील त्रिवेणी संगमाचे पवित्र जल अर्पण करून अनेकांना पावन पर्वकाळात स्नान घडवून आणण्याची किमया संगमनेर मध्ये साधली गेली आहे. या कल्पकतेची सर्वत्र कौतुक मिश्रीत शब्दात चर्चा होत आहे.

मालपाणी हेल्थ क्लबचे सभासद मिलिंद सराफ हे नुकतेच तीर्थराज प्रयागराज येथे त्रिवेणी संगमात महाकुंभ स्नान करून संगमनेरला परतले. इकडे येताना त्यांनी आठवणीने तेथील गंगा यमुना सरस्वती या तीन नद्यांच्या संगमाचे पवित्र जल मंगल कलशात भरून आणले. आज मंगळवारी १८ फेब्रुवारी रोजी सकाळी क्लबच्या जलतरण तलावात मालपाणी उद्योग समूहाचे चेअरमन राजेश मालपाणी यांच्या हस्ते मंगल कलशातील पवित्र जल अत्यंत उत्साहाच्या वातावरणात व जयघोषात अर्पण करण्यात आले. त्यामुळे जलतरण तलावातील पाणीही महाअमृतकुंभमय झाले.

तब्बल १४४ वर्षांनी आलेला हा पावन योग असल्याने या गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे जे कोणी प्रत्यक्ष प्रयागराज येथे जाऊ शकले नाहीत त्यांना येथील स्नानाने महाकुंभ स्नानांचे पुण्य प्राप्त झाले. जलतरणासाठी आलेल्या सर्वांनी नेहमी पेक्षा आजच्या पोहण्याचा आनंद आणि आध्यात्मिक समाधान निराळी असल्याची भावना बोलून दाखविली. मिलिंद सराफ यांनी आठवणीने सर्वांसाठी ही पर्वणी उपलब्ध करून दिल्याबद्दल मालपाणी यांनी त्यांना पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले.

यावेळी मालपाणी यांच्यासह क्लबचे सभासद सर्वश्री रामेश्वर भंडारी, गुरु बाप्ते, नवनीत कोठारी, नेहमीचंद निहलाणी, बंटी निहलाणी, विक्रम पडतानी, राजेंद्र गुंजाळ, कैलास हासे, महेश जाजू , बाळासाहेब गणोरे, सदाशिव थोरात, नंदू काळण मिलिंद कुलकर्णी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मालपाणी हेल्थ क्लबच्या एका कल्पक सभासदाने आजच्या अनोख्या कृतीने सर्वांना घडविलेले मंगल स्नान सर्वांनाच पावित्र्याचा सुखद अनुभव देऊन गेले आहे.

सभासद म्हणजे एक घट्ट परिवार
मालपाणी उद्योग समूहाच्या वतीने अनेक वर्षांपासून अत्याधुनिक मालपाणी हेल्थ क्लब चालविला जातो. या संकुलात जॉगिंग ट्रॅक, प्रशस्त जलतरण तलाव, मॉडर्न जिम्नेशियम, झुम्बा, मेडीटेशन हॉल, टेबल टेनिस , बॅडमिंटन, बास्केटबॉल कोर्ट, स्टीम बाथ यांसह अनेक सुविधा उपलब्ध आहेत. अनेक वर्षांपासून संगमनेर मधील असंख्य व्यायामपटू घडविणारा क्लब असा लौकिक क्लबला मिळाला आहे. येथे नियमितपणे येणारे सभासद म्हणजे एक घट्ट परिवार बनला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

श्रीरामपूर: नगराध्यक्ष पदासाठी चौघांची एन्ट्री, तर नगरसेवक पदासाठी दहा उमेदवार रिंगणात ; कोणी केले अर्ज सादर?

श्रीरामपूर / नगर सह्याद्री नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी शहरात उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून...

नगर–मनमाड महामार्गावर अग्नितांडव! लक्झरी बस–कारची भीषण धडक; कारचालक जळून ठार

अहिल्यानगर / नगर सह्याद्री – नगर–मनमाड महामार्गावर कोपरगावजवळील भास्कर वस्ती येथे शुक्रवारी (14 नोव्हेंबर)...

​महापालिका निवडणूक: मतदार यादीचा ‘मुहूर्त’ पुन्हा लांबणीवर

​महापालिका निवडणूक: मतदार यादीचा ‘मुहूर्त’ पुन्हा लांबणीवर आता २० नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार प्रारूप यादी ​दुबार नावांचा...

डॉ. बोरगेंच्या अडचणी कायम ; साडेसोळा लाखांच्या अपहार प्रकरणी अधिक तपासाचे आदेश

डॉ. बोरगेंच्या अडचणी कायम ; साडेसोळा लाखांच्या अपहार प्रकरणी अधिक तपासाचे आदेश ९ फेब्रुवारीपर्यंत अहवाल...