अहमदनगर | नगर सह्याद्री –
वकील वकिल संरक्षण कायदा त्वरित लागू करावा या मागणीसाठी शहर वकील संघटनेच्या सर्व वकिलांनी दोन दिवसापासून न्यायालयीन कामकाज बंद ठेवत धरणे आंदोलन सुरु केले आहे. शहर भाजपच्या पदाधिकार्यांनी व भाजपा वकील आघाडीच्या वतीने वकिलांच्या आंदोलनास पाठिंबा देत आंदोलन कर्त्यांची भेट घेतली.
यावेळी शहराध्यक्ष अॅड.अभय आगरकर यांनी आंदोलन स्थळाहून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांना येथे सुरु असलेल्या धरणे आंदोलनाची माहिती देवून या प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती केली. यावेळी उपमुख्यमंत्री फडणीसांनी त्वरित प्रतिसाद देत राज्यात वकिल संरक्षण कायदा होण्यासाठी लक्ष घालू असे आश्वासन दिले.
यावेळी माजी जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड, ज्येष्ठ नेते वसंत लोढा, शहर विधानसभा निवडणूक प्रमुख महेंद्र गंधे, सचिन पारखी, प्रशांत मुथा, वकील आघाडीचे अध्यक्ष अॅड. चंदन बारटक्के, मयूर बोचूघोळ, दत्ता गाडळकर, महेश नामदे, धनंजय जाधव, अॅड.अविनाश साखला, बाळासाहेब खताडे, वकील आघाडीचे अॅड. संदिप शेळके, अॅड. संदिप काळे. अॅड. सुनिल तोडकर, अॅड. पिंटु पाटोळे, अॅड. वर्धमान भंडारी, अॅड. सचिन घाडगे, अॅड. हरीश कुमार कल्याणी, अॅड. व्यंकटेश शिरसुल, अॅड. रविंद्र लगड, अॅड. पोपट पालवे, प्रवीण पालवे, गणेश शर्मा आदींसह शहर वकील संघटनेचे पदाधिकारी व मोठ्या संख्यने वकील उपस्थित होते.