spot_img
ब्रेकिंगदुर्दैवी! खेळता खेळता जिवनाचा बालपणात शेवट झाला..! ४ वर्षीय चिमुकल्यासोबत नेमकं काय...

दुर्दैवी! खेळता खेळता जिवनाचा बालपणात शेवट झाला..! ४ वर्षीय चिमुकल्यासोबत नेमकं काय घडलं?

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
अहमदनगरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे, ज्यात खेळता खेळता पाण्याच्या हौदात पडून एका 4 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना मुकुंदनगर परिसरात रविवारी (4 ऑगस्ट) सायंकाळी घडली. मृत मुलाचे नाव समर शेख असून, ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुकुंदनगरमध्ये शेख कुटुंबीय राहतात. सोमवारी सायंकाळी त्यांचा 4 वर्षीय मुलगा समर शेख अंगणात खेळत होता. खेळता खेळता तो पाण्याचा हौदाजवळ गेला. हौदावर कुचकामी झाकण ठेवले होते. समर झाकणावर उभा राहिल्यामुळे ते उघडून समर हौदात पडला. हौदात पाण्याचा मोठा साठा असल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. बराच वेळ उलटून गेला तरी समर दिसत नसल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरु केला.

तब्बल 5 तास शोधाशोध करूनही समर सापडला नाही. एका व्यक्तीने हौदात पाहिल्यावर, समरचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला. डोळ्यादेखत चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने समरच्या कुटुंबियांनी मोठा आक्रोश केला. समरचा मृतदेह हौदातून बाहेर काढण्यात आला. हौदाचे झाकण व्यवस्थित न ठेवणाऱ्या संबंधित व्यक्तीवर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी समरच्या कुटुंबियांनी केली आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...

सैफ अली खानला धक्का! सरकारचा मोठा निर्णय

मुंबई । नगर सहयाद्री:- सैफ अली खान याच्या भोपाळमधील पतौडी घराण्याची मालमत्ता उच्च न्यायालयानं...