spot_img
अहमदनगररस्त्यावर अनधिकृत बांधकाम; 40 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, अहिल्यानगर क्राईम वाचा एका क्लिकवर..

रस्त्यावर अनधिकृत बांधकाम; 40 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, अहिल्यानगर क्राईम वाचा एका क्लिकवर..

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर येथील कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत सार्वजनिक रस्त्यावर अनधिकृतपणे भिंत बांधण्याचा प्रकार घडला असून, या प्रकरणात नरेंद्र संपतलाल बाफना (वय 60) याच्यासह 35 ते 40 अज्ञात गुंडांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. शेख आलताफ रहिम (वय 63, रा. हज्जी इब्राहिम इस्टेट) यांनी ही तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनुसार, 30 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 3 वाजता, टी.पी. स्कीम क्रमांक 3 मधील फायनल प्लॉट नंबर 49 आणि 50 जवळील 30 फूट सार्वजनिक रस्त्यावरील उज्वल कॉम्प्लेक्सजवळ, नरेंद्र बाफना यांनी मोठ्या प्रमाणावर गुंडांना आणून रस्त्यावर अनधिकृत भिंत बांधण्यास सुरुवात केली. हे बांधकाम शेख आलताफ यांच्या मालकीच्या प्लॉटचा रस्ता बंद करण्याच्या हेतूने केले गेले, असा आरोप करण्यात आला आहे.

सदर रस्ता नगर रचना विभागाने 1976 मध्ये मंजूर केलेल्या रेखांकनानुसार सार्वजनिक असून, स्थानिक नागरिकांचा नेहमी यावरून वावर असतो. तरीही रस्त्याचा अडथळा निर्माण करून बांधकाम करण्यात आले. घटनेदरम्यान शेख आलताफ यांच्या मामेभावू सय्यद इक्राम आब्बास यांच्या घरात गुंडांनी घुसून सीसीटीव्ही सेटअप जबरदस्तीने घेतला व घराबाहेरील कॅमेरे फोडले असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 52, 53, 54, मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 चे कलम 260(1)(2), 278 तसेच पब्लिक प्रिमायसेस (इव्हिक्शन ऑफ अनऑथोराइज्ड ऑक्युपंट) ॲक्ट 1971 चे कलम 11, तसेच भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम 126(2), 211 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महिलांना धक्काबुक्की करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

मुलीची छेडछाड; भावावर हल्ला
कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याची घटना समोर आली आहे. यानंतर मुलीच्या भावाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तसेच झटापटीत त्याच्या गळ्यातील सोन्याची साखळी गहाळ झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी ओम वाणी आणि प्रथमेश घुबे (दोघेही रा. संमृद्धीनगर, वाकोडीनगर, अहिल्यानगर) यांच्याविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 26 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 4 वाजेच्या दरम्यान 17 वषय विद्यार्थिनी आयटीआय कॉलेजच्या मागील गेटसमोरील रस्त्याने घरी जात असताना ओम वाणी याने तिचा हात धरून लज्जास्पद वर्तन केले. मुलीने तात्काळ घरी जाऊन ही घटना पालकांना सांगितली. 27 ऑगस्ट रोजी रात्री 9:30 वाजेच्या दरम्यान पीडितेचा भाऊ आनंद ऋषी हॉस्पिटलजवळून चाणक्य चौकाकडे जात असताना ओम वाणी व प्रथमेश घुबे यांच्याशी त्याची भेट झाली. छेडछाडीचा जाब विचारल्यावर, ओम वाणीने त्याला शिवीगाळ करत मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या झटापटीत गळ्यातील अंदाजे 1 तोळ्याची सोनसाखळी गहाळ झाली असल्याची तक्रारीत नमूद आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शितल मुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

राहुरीत पोलिसांची 30 वाहनांवर दंडात्मक कारवाई
राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत चोरलेल्या आणि विना नंबर प्लेट वापरल्या जाणाऱ्या दुचाकींच्या तपासासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये तब्बल 30 दुचाकी वाहने विना नंबर प्लेट आढळून आल्या असून, त्यापैकी 26 वाहनचालकांनी कागदपत्रे सादर करून नंबर प्लेट बसवून घेतल्याने त्यांच्यावर एकूण 14,000 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. उर्वरित 4 गाड्यांची कागदपत्रे अद्याप सादर न करण्यात आल्यामुळे त्या गाड्या राहुरी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्या आहेत. अनेक नागरिक अल्पदरात चोरीच्या किंवा बिननोंदणीच्या गाड्या खरेदी करून वापरत आहेत, अशी माहिती मिळाल्यानंतर 29 ऑगस्ट रोजी ही मोहीम राबवण्यात आली. संबंधित वाहनचालकांनी जर लवकरच आवश्यक कागदपत्रे सादर केली नाहीत, तर सदर गाड्या चोरीच्या असल्याचे मानून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. ही मोहीम पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पार पडली. मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक विष्णू आहेर, सहायक फौजदार भाऊसाहेब आव्हाड, पोहेकॉ बाप्पू फुलमाळी, तसेच पोलीस आणि होमगार्डांच्या पथकाने सहभाग नोंदवला.

अल्पवयीन चालकांवर 25 हजारांचा दंड!
राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवयीन वाहनचालकांकडून वाहन चालवण्याचे प्रमाण वाढले असून, यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढत आहे. अल्पवयीन चालकांकडून वाहन चालवल्यास पालकांवर सुमारे 25,000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले. पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या अल्पवयीन मुलांकडे कोणत्याही प्रकारचे वाहन चालवण्यासाठी देऊ नये, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

संगमनेर तापलं! आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला, बाजारपेठ बंद आणि महायुतीचा मोर्चा, मंत्री विखे पाटील काय म्हणाले, पहा..

संगमनेर । नगर सहयाद्री:- गेल्या काही दिवसांपासून संगमनेर तालुक्यातील राजकीय वातावरण आधीच तणावपूर्ण असताना,...

गुलाल घेतल्याशिवाय मागे हटणार नाही; आझाद मैदानावरून मनोज जरागेंची मोठी गर्जना!

मुंबई | नगर सह्याद्री राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा...

रानात हत्येचा थरार! नवऱ्याचे बायकोवर धारदार शस्त्राने डझनभर वार, कारण काय?

Maharashtra Crime: परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील सोनपूर तांडा येथे पतीने पत्नीवर शेतामध्ये धारदार शस्त्राने...

…आता माझी जबाबदारी; पारनेरकरांसमोर डॉ. सुजय विखे यांनी स्पष्ट शब्दात मांडले मत

निघोज । नगर सहयाद्री:- शेतकरी कर्जमाफी आणि कांद्याच्या भाववाढीसाठी 'आपली माती आपली माणसं' या...