spot_img
अहमदनगर..अन मोदी यांचा कंठ दाटून आला!! आज सोलापुरात गृहप्रकल्पाचे लोकार्पण

..अन मोदी यांचा कंठ दाटून आला!! आज सोलापुरात गृहप्रकल्पाचे लोकार्पण

spot_img

सोलापूर | नगर सह्याद्री

हजारो गरिबांसाठी, हजारो मजुरांसाठी आम्ही एक संकल्प केला होता. तो आज पूर्ण होतोय याचा आनंद वाटतो. पीएम आवास योजनेच्या अंतर्गत देशातील सर्वात मोठ्या सोसायटीचे लोकार्पण सोलापूरला होत आहे. मी ही सोसायटी पाहून आलो आणि मनात विचार आला मलाही लहानपणी अशा घरांमध्ये राहण्याची संधी मिळाली असती तर…, असे म्हणतेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गहिवरून आले.

देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचे लोकार्पण शुक्रवारी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. सोलापुरातील रे नगरमध्ये तब्बल ३५० एकरवर ८०० पेक्षा अधिक इमारती उभारण्यात आल्या आहेत. यात एकूण ३० हजार फ्लॅट्स असतील. पैकी १५ हजार फ्लॅट्सचे काम पूर्ण झाले आहे.

त्यांचे लोकार्पण मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी भाषण करताना मोदींचे डोळे पाणावले, त्यांचा कंठ दाटून आला. पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे भाषण थांबवले. समोर ठेवलेल्या ग्लासातील पाणी प्यायले. त्यांचा कंठ दाटून आला होता. डोळे भरुन आले होते. मोदी यांनी भावनांना आवर घालत भाषण पुढे सुरू ठेवले. ते म्हणाले, ‘या वास्तू पाहिल्यावर मनाला समाधान वाटते. हजारो कुटुंबांची स्वप्न साकार होतात तेव्हा त्यांचे आशीर्वाद मिळतात. हीच माझी कमाई आहे. जेव्हा मी या प्रकल्पाचे भूमिपूजन केले होते, तेव्हा मी तुम्हाला शब्द दिला होता. या प्रकल्पाचे लोकार्पण करायलाही मीच येईन, असे वचन मी तुम्हाला दिले होते,’ याची आठवण मोदींनी करुन दिली.

मोदी म्हणाले, दोन प्रकारचे विचार असतात. एक म्हणजे लोकांना भडकावण्याचा, दुसरा श्रमिकांचा सन्मान करण्याचा. आम्ही दुसर्‍या विचाराने पुढे चालतो. श्रमिकांचा सन्मान, गरिबांचे कल्याण हाच आमचा विचार आहे. आपल्या देशात कित्येक वर्षे गरिबी हटावची घोषणा दिली गेली. पण गरिबी हटली का? गरिबांच्या नावे योजना तयार केल्या जायच्या. पण त्यांचा लाभ गरिबांना मिळायचाच नाही. त्यांच्या हक्काचा पैसा मध्यस्थच खायचे,’ अशा शब्दांत मोदी यांनी मागील सरकारांवर टीका केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मागण्या पूर्ण, आंदोलन संपले; नुकसानीचे काय?; न्यायालयाची जरांगे, आयोजकांना विचारणा

मुंबई / नगर सह्याद्री - मराठा समाजाला कुणबी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मराठा नेते मनोज जरांगे...

एमआयडीसीत बाप्पाला निरोप; पारंपारिक ढोल-ताशांच्या गजरात रंगली विसर्जन मिरवणुक

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - एमआयडीसी परिसरात गेल्या सात दिवसांपासून सुरु असलेला गणेशोत्सव मंगलमय...

मनपा प्रारूप प्रभाग रचनेवर ठाकरे शिवसेना हरकती घेणार : शहरप्रमुख काळे

इच्छुकांची चाचपणी सुरू, आघाडी बाबत योग्य वेळी निर्णय घेऊ अहिल्यानगर / नगर सह्याद्री - अहिल्यानगर...

बिबट्याच्या हल्ल्यात पारनेर तालुक्यात 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

  कळस परिसरात ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाकडे तातडीने कारवाईची मागणी गणेश जगदाळे / नगर सह्याद्री : पारनेर...