spot_img
ब्रेकिंगएकनाथ शिंदेंना हरवण्यासाठी उद्धव ठाकरेंचा 'मास्टरप्लॅन'; कुणाला देणार तिकीट? वाचा..

एकनाथ शिंदेंना हरवण्यासाठी उद्धव ठाकरेंचा ‘मास्टरप्लॅन’; कुणाला देणार तिकीट? वाचा..

spot_img

Vidhan Sabha Election 2024 : राज्यातील सर्वच प्रमुख पक्ष विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा करत आहेत. भाजपाने आतापर्यंत आपल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही 22 ऑक्टोबर रोजी आपल्या उमेदवारांची पहिली यादी सार्वजनिक केली आहे. या यादीत एकूण 45 उमेदवारांचा समावेश आहे. या पहिल्याच यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचादेखील समावेश आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदेंना घेरण्यासाठी उद्धव ठाकरे मोठी खेळी करण्याच्या तयारीत आहेत. एकनाथ शिंदे यांची ठाण्यात मोठी ताकद आहे, त्यांच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी चक्रव्यूह रचलेय. विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना ठाण्यातच अडकवण्यसाठी ठाकरेंनी हा प्लॅन आखल्याचे बोलले जात आहे. एकनाथ शिंदे यांच्याविरोधात उद्धव ठाकरे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या पुतण्याला तिकीट देण्याची शक्यता आहे.

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर केदार दिघे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला. ठाकरेंनीही त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवत जिल्हा अध्यक्षपद दिले. केदार दिघे यांनी लोकसभेला ठाकरेंसाठी शंभर टक्के काम केले. केदार दिघे यांना आता उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंच्या विरोधात उतरवणार असल्याचे बोलले जात आहे. केदार दिघे हे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांचे पुतणे आहेत, सध्या ते शिवसेना ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख आहेत.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून एकनाथ शिंदे हे दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांच्यासह दिवंगत नेते आनंद दिघे यांचा उल्लेख आवर्जुन करतात. आनंद दिघे यांचा राजकीय वारसा एकनाथ शिंदे पुढे चालवत आहेत, असे महाराष्ट्राच्या राजकारणात म्हटले जाते. मात्र आनंद दिघे यांचे पुतणेच शिंदे यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये खासदार लंके गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

  पारनेर / नगर सह्याद्री- जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पारनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस...

‘साकळाई’ची प्रशासकीय मान्यता घेऊन तात्काळ भूमिपूजन, प्रत्यक्ष कामाला सुरुवात करावी

साकळाई योजना कृती समितीची बैठक हिवरे झरे येथे संपन्न सुनील चोभे / नगर सह्याद्री- नगर तालुक्यातील...

पारनेरमध्ये बिबट्या जेरबंद; भीतीच्या सावटाखाली ग्रामस्थ

पारनेरमध्ये बिबट्या जेरबंद; भीतीच्या सावटाखाली ग्रामस्थ शेतकऱ्याची शेळी खाल्ल्यानंतर वन विभागाची मोहीम यशस्वी सुपा / नगर...

वनविभागाच्या निष्क्रियता: पारनेर तालुक्यात बिबट्यांचा वाढता उपद्रव; कळस येथील घटनेने खडकवाडी येथील घटनेची आठवण!

गणेश जगदाळे | नगर सह्याद्री पारनेर तालुक्याच्या उत्तर भागात मुळा नदीचा पट्टा व मुळा धरण...