spot_img
महाराष्ट्रउद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय.. देवेंद्र फडणवीस यांची घणाघाती टीका

उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय.. देवेंद्र फडणवीस यांची घणाघाती टीका

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : अभिषेक घोसाळकर हत्या प्रकारानंतर अराजकीय आरोप प्रत्यारोपांचा धुराळा उठला आहे. उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठा घणाघात केला होता. महाराष्ट्राला मनोरुग्ण गृहमंत्री भेटलेत असे ते म्हणाले होते. दरम्यान आता फडणवीस यांनीही मोठा घणाघात उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.

काय म्हणाले उपमुख्यमंत्री फडणवीस?
राज्यात गुन्हेगारीच्या घटना वाढल्या आहेत, त्या बद्दल देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “ज्या काही घटना घडलेल्या आहेत, या व्यक्तीगत वैमनस्यातून घडलेल्या आहेत. त्याची गंभीरता मी नाकारत नाही. पण याचा कायदा-सुव्यवस्थेशी संबंध जोडणं चुकीच आहे.

दोन-तीन घटनांमध्ये त्यांची व्यक्तीगत भांडण, व्यवहार आहेत. आम्ही यामध्ये कठोर कारवाई करुच” सरकार गुंडांच्या मागे उभ राहिल्यास खून-खराबे वाढतील असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यावर फडणवीसांनी उत्तर दिलं. “त्यांची भाषा आणि शब्द पाहिल्यानंतर माझ ठाम मत झालय, उद्धवजींच्या डोक्यावर परिणाम झालाय. मी एवढच म्हणीन गेट वेल सून. मी त्याच्या वक्तव्यावर कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही. ईश्वराकडे मी एवढीच प्रार्थना करीन, गेट वेल सून”.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

हवामानात मोठा बदल; पुन्हा पावसाची हजेरी!, राज्यातील ‘या’ भागांना यलो अलर्ट

मुंबई | नगर सहयाद्री:- महाराष्ट्रात परतीच्या मान्सूनने पुन्हा एकदा सक्रिय होत राज्यातील अनेक भागात...

वनविभाग झोपलंय का? बिबट्याच्या हल्ल्यांत वाढ; अंगणातून चिमुकलीला उचलून नेलं..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नागरी वस्तीमध्ये वन्य प्राण्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यामुळे...

अहिल्यानगरमध्ये आढळलेल्या मृतदेहाचा उलगडा; प्रेयसीने घेतला प्रियकराचा जीव!, वाचा क्राईम..

संगमनेर । नगर सहयाद्री तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील शिवप्रभा ट्रस्टमध्ये एका तरुणाचा 12 ऑक्टोबर...

आर्थिक स्थिती राहणार मजबूत, कोणाला मिळणार पगारवाढीची गूडन्यूज ? वाचा, आजचे राशी भविष्य!

मुंबई । नगर सह्याद्री मेष राशी भविष्य तुम्हाला निवांत आरामाची गरज आहे आणि जवळचे मित्र व...