spot_img
अहमदनगरउद्धव ठाकरेंचा उपनेता चोर निघाला!; दीड कोटींच्या फसवणुकीत 'साजन' मास्टरमाईंड

उद्धव ठाकरेंचा उपनेता चोर निघाला!; दीड कोटींच्या फसवणुकीत ‘साजन’ मास्टरमाईंड

spot_img

खा. संजय राऊत यांनी मांडीवर घेतलेला साजन पाचपुते झाला फरार
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
इंदोर येथील साखर व्यापार्‍याची जवळपास पावणेतीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा उपनेता आणि काष्टीचा सरपंच साजन पाचपुते हाच मास्टरमाईंड असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे अतिरिक्त डीसीपी राजेश दंडोतिया यांच्या पथकाच्या गळाला मितेश नहाटा लागताच साजन पाचपुते याने मोबाईल बंद करून पळ काढला! दरम्यान, साजन पाचपुते याला मुंबईत आश्रय दिला गेल्याची माहिती समोर येताच गुन्हे शाखेने शिवसेनेतील एका बड्या नेतृत्वावर करडी नजर ठेवण्यास प्रारंभ केल्याचेही समोर येत आहे.

काष्टीसारख्या गावचा सरपंच असतानाही आणि संघटनेत कोणतेही योगदान नसताना साजन पाचपुते हा थेट शिवसेनेचा उपनेता म्हणून जाहीर करण्यात आला त्याचवेळी जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या सर्व पदाधिकार्‍यांसह अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. मात्र, त्याच वेळी हाच साजन पाचपुते ठाकरे यांना अडचणीत आणणार आणि त्यास सर्वस्वी संजय राऊत हेच कारणीभूत ठरणार अशी अटकळ बांधली गेली होती. पावणेतीन कोटींच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात साजन पाचपुते याचे नाव येताच जिल्ह्यातील शिवसैनिकांनी बांधलेली अटकळ अखेर खरी ठरली.

इंदोर येथील साखर व्यापार्‍यांची २ कोटी ६१ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी जैन समाज आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष मितेश नाहटा याला अटक करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे सेनेचा उपनेता साजन पाचपुते फरार आहे. दरम्यान, नाहाटा व पाचपुते यांनी संगनमत करून इंदोरमधील दर्शन इंटर प्राइज, राधा कृष्ण ट्रेडर्स, चंचल ट्रेडर्स, श्री कृष्णा ट्रेडर्स आणि पी. योगेश चंद्रा अँड कंपनी या कंपन्यांकडून साखर पुरवठ्याच्या बदल्यात २ कोटी ६१ लाख रुपये घेतले. मात्र, साखर न पाठवता दिल्लीतील एका व्यावसायिकाच्या खात्यात ही रक्कम हस्तांतरित केली. नाहाटा हा पुणे येथील भुलेश्वरी शुगरचा मालक आहे. नाहाटा मुंबईहून दिल्लीला विमानाने जात असताना दिल्ली विमानतळावर गुन्हे शाखेची विशेष टीमने अटक केल्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे अतिरिक्त डीसीपी राजेश दंडोतिया यांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकरणात फरार झालेल्या साजन पाचपुते याचा शोध घेण्यासाठी पोलिस पथके तयार करण्यात आली असल्याचे सुत्रांनी सांगितले. साजन पाचपुते यास मुंबईत कोणी आश्रय दिलाय याचा शोध घेतला जात असून प्रसंगी त्याला आश्रय देणारा कितीही मोठा नेता असला तरी त्याला देखील सहआरोपी केले जाईल असे गुन्हे शाखेकडून सांगण्यात आले.

पाचपुते याची उपनेतेपदावरुन हकालपट्टी कधी होणार?
फसवणुकीच्या गंभीर गुन्ह्यात अडकलेल्या आणि त्याच्या सहभागाने शिवसेनेची बदनामी होत असताना साजन पाचपुते याची उपनेते पदावरुन अद्यापही हकालपट्टी का करण्यात आली नाही असा थेट सवाल ठाकरे गटाच्या पदाधिकार्‍यांनी उपस्थित केला आहे. संजय राऊत यांनी साजन याला जावई करुन घ्यावे परंतू, शिवसेनेतील उपनेतेपदावरुन उद्धव ठाकरे यांनी त्यास तत्काळ हटवावे अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात नाव आल्यानंतर मितेश नाहाटा याची अजित पवार गटातील राष्ट्रवादी युवकच्या प्रदेश उपाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली असताना साजन पाचपुते याला मांडीवर घेणार्‍यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचा टोलाही शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी लगावला आहे.

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आ. दातेंनी विधानसभेत मांडली शेतकऱ्यांची व्यथा; पारनेर तालुक्यात बोगस बियाणे विकणारे दलाल; ‘त्यांचा…’

पारनेर । नगर सहयाद्री:- आमदार काशिनाथ दाते यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे भक्कमपणे...

मर्चंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेकडून ‌’शेड्यूल्ड बँक‌’ दर्जा प्राप्त

विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि व्यावसायिक विस्तारात वाढ होणार: हस्तीमल मुनोत अहिल्यानगर । नगर सहयाद्री अहिल्यानगरच्या आर्थिक क्षेत्रात...

भिंगार शहरासाठी आता स्वतंत्र नगरपालिका; जिल्हा नियोजन समितीतून मिळणार निधी

अहिल्यानगर । नगर सहयाद्री येथील भिंगार शहरासाठी स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याचा धोरणात्मक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र...

निळवंडे ८२ तर जायकवाडी ७0 टक्के भरले; भंडारदरा धरणात किती पाणीसाठा?, वाचा सविस्तर

आहिल्यानगर । नगर सहयाद्री:- मराठवाड्यासाठी जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे....