spot_img
अहमदनगरउध्दव ठाकरे हेच मुख्यमंत्री होतील; पारनेरच्या मशाल यात्रेत काय म्हणाले डॉ. श्रीकांत...

उध्दव ठाकरे हेच मुख्यमंत्री होतील; पारनेरच्या मशाल यात्रेत काय म्हणाले डॉ. श्रीकांत पठारे पहा…

spot_img


शिवसेनेच्या मशाल यात्रेला पारनेर तालुक्यातून उस्फुर्त प्रतिसाद, गावागावात-वाड्यावस्त्यांवर जल्लोषात होतंय जंगी स्वागत…

गणेश जगदाळे / नगर सह्याद्री
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने पारनेर तालुक्यात तालुकाप्रमुख डॉ.श्रीकांत पठारे यांच्या नेतृत्त्वाखाली भगवा सप्ताहानिमित्त आयोजित भव्य मशाल यात्रेला पारनेर तालुक्यातून नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून तालुक्यातील गावोगावी आणि वाड्यावस्त्यांवर या यात्रेचे जल्लोषात स्वागत केले जात आहे. तालुक्यातील सर्वच स्तरातील नागरिकांनी पुन्हा एकदा उध्दव ठाकरे हेच मुख्यमंत्री व्हावेत अशी मनोकामना व्यक्त केली आहे. तसेच पारनेर-नगर मतदारसंघाची विधानसभेची जागा महाविकासआघाडीमधून शिवसेनेलाच घेण्याची मागणी केलेली आहे. आम्ही सर्वच गावांतील सर्वधर्मीय देवदेवतांचे दर्शन घेत असून त्यांच्या आशिर्वादाने पुन्हा एकदा नक्कीच उध्दव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील आणि राज्यात सर्वसामान्यांचे सरकार येईल असा विश्वास डॉ. श्रीकांत पठारे यांनी व्यक्त केला आहे.

डॉ. श्रीकांत पठारे यांच्या नेतृत्त्वाखाली टाकळी ढोकेश्वर येथून सुरु झालेली मशाल यात्रा टाकळी ढोकेश्वर, ढवळपुरी, कान्हुर पठार जिल्हा परिषद गटांतील गावोगावी व वाड्या वस्त्यांवर पोहचली डॉ.श्रीकांत पठारे यांच्यासोबत या यात्रेमध्ये युवासेना तालुकाप्रमुख अनिल शेटे, महिलाआघाडी तालुकाप्रमुख प्रियंका खिलारी, शेतकरीआघाडी तालुकाप्रमुख गुलाबराव नवले, जेष्ठ नेते डॉ.भास्कर शिरोळे, शिववाहतूकसेनेचे राज्य उपाध्यक्ष धनंजय निमसे, बाजार समिती संचालक किसन सुपेकर, बाबासाहेब नर्हे, माजी पंचायत समिती पोपट चौधरी, कान्हुर पठार गटप्रमुख बाबासाहेव रेपाळे, टाकळी ढोकेश्वर गटप्रमुख अनिकेत देशमाने, अळकुटी विभागप्रमुख सखाराम उजागरे, गटप्रमुख संतोष येवले, गणप्रमुख संतोष साबळे, नितीन आहेर, सरपंच रामदास खोसे, माजी सरपंच देवराम मगर, शेतकरी आघाडी उपतालुकाप्रमुख किसन चौधरी, दिपक मावळे, युवासेना पदाधिकारी सुयोग टेकुडे, मोहन पवार, अक्षय दुश्मन, अक्षय गोरडे, प्रशांत निंबाळकर, मोहित जाधव, अभिजीत खरमाळे, मंगेश सालके, अशोक भोसले, प्रशांत पठारे, विशाल पठारे, गोरख पठारे, स्वप्नील पुजारी, महेंद्र पांढरकर, ऋषिकेश नरसाळे, दिपक सुपेकर, डॉ.नीता पठारे, मंगल पठारे, प्रमोद पठारे, ऋषिकेश माने, अक्षय फापाळे, पप्पू रोकडे यांसह शिवसैनिक मोठ्या संखेने उपस्थित आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राजकारणात खळबळ!, शरद पवार-अजित पवार आज एकत्र येणार?

मुंबई । नगर सहयाद्री:- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी काल...

नागरिकांनो सतर्क राहा! हवामान खात्याचा हादरवणारा रिपोर्ट; ‘या’ जिल्ह्यांना हाय अलर्ट?

Weather Update: राज्यातील तापमानात घट झाली असून उकाड्यातही दिलासा मिळाला आहे. आज मध्य महाराष्ट्र...

शरद पवारांच्या वक्तव्यावर मंत्री विखे पाटलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, ‘दोघं एकत्र आले तर…’

Politics News: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा राज्यात खूप रंगल्या असताना, गुरुवारी राज्याचे जलसंपदा...

आजचे राशी भविष्य! ‘मे’ महिन्यातील उत्तम दिन, ‘या’ राशीच्या जीवनात मोठे बदल घडणार

मुंबई। नगर सह्याद्री मेष राशी तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यास लाभदायक दिवस. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची...