spot_img
ब्रेकिंगउद्धव ठाकरे म्हणजे राजकीय लव्ह जिहाद!; मंत्री नितेश राणेंचा पलटवार

उद्धव ठाकरे म्हणजे राजकीय लव्ह जिहाद!; मंत्री नितेश राणेंचा पलटवार

spot_img

मुंबई | नगर सहयाद्री:-
शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे यांच्यावर कडवट शब्दांत पलटवार केला आहे. त्यांनी राजकीय लव्ह जिहादचं उत्तम उदाहरण म्हणजे उद्धव ठाकरे असा घणाघात केला आहे.

नितेश राणे म्हणाले, मी हिंदुत्वासाठी झटणारा एक कार्यकर्ता आहे. आणि म्हणूनच हिंदू समाजासाठी काम करणाऱ्यांवर ज्या प्रकारे शिव्या व टीका केली जाते, ती त्यांच्या जिहादी हृदयातूनच येते. त्यांनी आपली भूमिका बदलल्यामुळे हिंदू समाजाचं रक्षण करणाऱ्यांचं कामच त्यांना आता खटकू लागलं आहे. हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा अपमान आहे.

राणे पुढे म्हणाले, स्वतःचा मुलगा कसा आहे हे ज्यांच्याकडे पाहण्याची तयारी नाही, ते इतरांवर टिप्पणी करत आहेत. ‘पेंग्विन’, ‘कोंबडी’ हे शब्द वापरणार्यांनी आपल्याच घराकडे पाहावं. मी जर दिशा सालियन, डिनो मॉरिओ याबाबत प्रश्न विचारतो, तर त्यांच्यातील अस्वस्थता वाढते. मला थांबवण्यासाठी मला लक्ष्य केलं जातं.

आज उद्धव ठाकरे हे हिंदुत्व सोडून राजकीय धर्मांतर करणाऱ्या नेत्याचं उत्तम उदाहरण आहेत, असा घणाघात राणेंनी केला. पुढे बोलताना ते म्हणाले, हिंदुत्वाच्या मार्गावरून दूर गेल्यामुळेच ठाकरे ब्रँडची अधोगती झाली. शिवसेना असो वा महाराष्ट्र, हिंदुत्वाशिवाय त्यांचा आत्मा अधुरा आहे. तुम्ही तुमचा वर्धापन दिन पाकिस्तानात साजरा करा कारण तिथेच तुमची नाळ जुळते, असा संतप्त टोला त्यांनी लगावला.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात उद्धव ठाकरे अप्रत्यक्षपणे नितेश राणे यांच्यावर टीका करत म्हटले होते, “भाजपचा एक बेडूक ओरडतो आहे, त्याला तेवढंच काम दिलेलं आहे. उंची पेंग्विनची, चाल बदकाची आणि आवाज कोंबडीचा.” तसेच पुढे म्हणाले, “तुझ्या वडिलांची पार्श्वभूमी काय? आणि तू शिवसेनेवर बोलतोस? कोणता तरी एक बाप ठरवा, याच भाषेत मी बोलतोय,” असे ठाकरेंनी ठणकावून सांगितले होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बाप्पा गणेशा, जरांगे पाटलांच्या जोडीने तुझंही स्वागत!

आयजी कराळे साहेब, वर्षभरापूर्वी तुमच्या डीजे बंदीला तुमच्याच अधिकाऱ्यांनी फाट्यावर मारले! कोण आवर घालणार...

शहर हादरलं! पोटच्या मुलाने आईला संपवलं, धक्कादायक कारण उजेडात..

Maharashtra Crime News: रएक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शांतीनगर परिसरात मुलानेच स्वतःच्या आईची...

मनोज जरांगेंना हायकोर्टाचा दणका, आरक्षणाबाबत सरकारने केली मोठी घोषणा

जालना | नगर सह्याद्री:- मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले...

बाप्पाच्या स्वागतासाठी नगरकर सज्ज; मंडळांची तयारी पूर्ण, पहा, फोटो..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गणेशोत्सवाचा जल्लोष रंगू लागला आहे. बाप्पाच्या...