मुंबई / नगर सह्याद्री : आता सर्वात मोठी राजकीय क्षेत्रातून आली आहे. मविआतील जागावाटप अंतिम टप्प्यात असून उद्धव ठाकरे यांची शिवसेना सर्वाधिक म्हणजेच २२ जागा लढवणार असल्याची माहिती आहे. काँग्रेस १६, तर शरद पवार यांची राष्ट्रवादी १० जागांवर लढणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे १५ उमेदवार निश्चित झाल्याचं समोर आलं आहे. यामध्ये शिर्डीची जागा उद्धव ठाकरे गटाकडे असून येथे भाऊसाहेब वाकचौरे यांना उमेदवारी फायनल झाली असल्याची माहिती मिळाली आहे.
उद्धव ठाकरे यांचे संभाव्य १५ उमेदवार
उत्तर पूर्व (ईशान्य) मुंबई – संजय दिना पाटील
दक्षिण मुंबई – अरविंद सावंत
उत्तर पश्चिम (वायव्य) मुंबई – अमोल कीर्तिकर
ठाणे – राजन विचारे
मुंबई महानगराबाहेरचे उमेदवार
रत्नागिरी सिंधुदुर्ग – विनायक राऊत
रायगड – अनंत गिते
हातकणंगले – राजू शेट्टी (बाहेरुन पाठिंबा)
मावळ – संजोग वाघेरे
हिंगोली – नागेश पाटील आष्टीकर
परभणी – संजय जाधव
छत्रपती संभाजीनगर – चंद्रकांत खैरे
धाराशिव – ओमराजे निंबाळकर
शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे
बुलढाणा – नरेंद्र खेडेकर
यवतमाळ वाशिम – संजय देशमुख