spot_img
ब्रेकिंगदोन तरुणांवर ‘गोळीबार’! नगरमधील 'या' पुलावर भयंकर घटना

दोन तरुणांवर ‘गोळीबार’! नगरमधील ‘या’ पुलावर भयंकर घटना

spot_img

जामखेड । नगर सहयाद्री:-
जामखेड येथील विंचरणा नदीच्या नवीन पुलावर रविवारी रात्री दहाच्या सुमारास तीन अज्ञात इसमांनी दोन जणांवर गोळीबार केला. एकाच्या पायाला गोळी लागली असून अहिल्यानगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. येथे लघवी करू नका महिला आहेत असे म्हणाल्याचा राग मनात धरून गोळीबार केल्याची प्राथामिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात अदित्य बबन पोकळे ( रा पोकळेवस्ती, जामखेड) यांनी फिर्याद दिली.

फिर्यादी अदित्य पोकळे जामखेड येथील विंचरणा नदीच्या नवीन पुलाजवळील पोकळे वस्तीवर वास्तव्यास आहे. रविवार दि. १ जून रोजी एका चारचाकी वाहनातून तीन अज्ञात इसम पोकळे वस्ती परिसरात उतरले. तेथे लघुशंका करू लागले. त्यावेळी फिर्यादी त्यांना येथे महीला बसल्या आहेत. यथे लघुशंका करू नका असे म्हणाले. त्यांना फिर्यादीचा राग आला. त्यांनी आदीत्य पोकळे व कुणाल बंडु पवार यांना मारहाण केली.

तसेच त्यांच्याजवळील पिस्टलने दोघांवर गोळीबार केला. कुणाल पवार याच्या पिंढरीतून गोळी आरपार गेली. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे. घटनची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक उगले व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपीच्या शोधार्थ तीन पथके रवाना करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील करत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पुढील चोवीस तासांत ठेवीदारांचे पैसे द्या, आम्ही पाठिंबा द्यायला तयार!

गोरेश्वर सहकार बचाव पॅनलचे प्रमुख बाबासाहेब तांबे यांचा विरोधकांवर हल्लाबोल पारनेर | नगर सह्याद्री पतसंस्था...

जीममध्ये भयंकर घटना! तरुणाला फरशीवर आपटले, कारण काय?

जामखेड । नगर सहयाद्री:- जीममध्ये तु उशिरा का आलास असे म्हणत एकास जीममध्येच उचलुन...

‘जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांची हिवरेबाजारला भेट’

अहिल्यानगर | नगर सह्याद्री हिवरेबाजार येथे गुरुवार 05 जून 2025 रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने ‌‘एक...

पारनेरकरांना खुशखबर! आमदार दाते यांच्या पाठपुराव्याला यश; या कामांसाठी 20 कोटी…

गणेश जगदाळे | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या मांडओहोळ धरणाच्या डावा कालवा दुरुस्ती, अस्तरीकरण...