spot_img
अहमदनगरगाव हादरलं! उन्हाळ्याच्या सुट्टीत आलेल्या दोघा नातेवाईकांनी साधला डाव? अल्पवयीन मुलीसोबत घडलं...

गाव हादरलं! उन्हाळ्याच्या सुट्टीत आलेल्या दोघा नातेवाईकांनी साधला डाव? अल्पवयीन मुलीसोबत घडलं भयंकर..

spot_img

अहमदगर । नगर सहयाद्री
जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात अल्पवयीन मुलीवर दोघा नातेवाईकांनी मिळून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेप्रकरणी राहूरी पोलीस ठाण्यात अपहरण, अत्याचार व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी: राहुरी तालुक्यातील एका गावात पीडित मुलीच्या घरी दिवाळीच्या व उन्हाळ्याच्या सुट्टीत तीचे नातेवाईक ऋषिकेश पांडुरंग धोंडे (वय २५) व सतीश विठ्ठल टकले (दोघे रा. आष्टी जि. बीड), हे दोघे येत होते.

या दोघांनी सन २०१६ ते एप्रिल २०२४ या दरम्यान मुलीवर लैंगिक अत्याचार करत मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग करून तिला वेळोवेळी ब्लॅकमेल केले. तसेच गावठी पिस्टलचा धाक दाखवून तिच्यावर वेळोवेळी विविध ठिकाणी अत्याचार केले.

नंतर ऋषिकेश धोंडे याने मुलीचे अपहरण करून तिला पुणे येथील आळंदी येथे घेऊन जाऊन तिच्याशी बळजबरीने लग्न केले. त्यानंतर तिला शारीरिक व मानसिक त्रास देऊन तिला फाशी देण्याचा तसेच विहिरीत ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मोठी बातमी! अजित पवारांचा स्वबळाचा इशारा…

पुणे / नगर सह्याद्री - राज्यात सध्या महायुतीचं सरकार असलं तरी स्थानिक निवडणुकीत सर्व पक्ष...

मनोज जरांगेंचा सरकारला अल्टीमेटम; बैठक निष्फळ, प्रमाणपत्र द्यावं लगेच आंदोलन सोडेन… राज्यात काय काय घडलं पहा

मुंबई | नगर सह्याद्री Maratha Reservation Row: आरक्षणाबाबत काम करणाऱ्या शिंदे समितीनं ६ महिन्यापासून...

मनोज जरांगे हा पवारांचा सुसाईड बॉम्ब; भाजप आमदार काय म्हणाले पहा

मुंबई / नगर सह्याद्री : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागण्यासाठीच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे....

चिचोंडीला कांदा मार्केट सुरु करण्याचा मानस: आ. कर्डिले

नेप्ती उपबाजार भव्य कांदा शेडचे भूमिपूजन अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- नेप्ती उपबाजारची जागा कमी पडत...