Accident News: राज्यात अपघाताच्या घटना सातत्याने घडत आहे. मुंबईतील कुर्ला बस अपघातात ७ जणांचा मृत्यू आणि तब्बल ४५ जण जखमी झाले असल्याची घटना नुकतीच घडली होती. आता, पुन्हा एकदा अपघाताची ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. अपघातात आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन मुलांचा वडिलांची प्रकृती देखील चिंताजनक असल्याची माहिती आहे. आईसह 2 मुलांचं मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
तासगाव-सांगली रोडवरील कुमठेफाटा जवळ भीषण अपघाताची घटना घडली. दुचाकीवरील दाम्पत्य आपल्या मुलांसह सांगलीहून आटपाडीकडे निघाले होते. ते कुमठेफाटा येथे आले असता वळणावर भरधाव वेगाने तासगावकडून येणार्या चाकी वाहनाने ओव्हरटेक करीत असताना समोरून येणार्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
अपघात इतका भीषण होता की, यामध्ये दुचाकीचे दोन तुकडे झाले. अपघातात आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला असून महिलेच्या पतीवर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती देखील चिंताजनक असल्याची माहिती आहे. पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला आहे.