spot_img
ब्रेकिंगदोन लाख लंपास, बांधकाम व्यावसायिकाला धमकी तर चुलत्याला पुतण्यांची मारहाण; वाचा अहिल्यानगर...

दोन लाख लंपास, बांधकाम व्यावसायिकाला धमकी तर चुलत्याला पुतण्यांची मारहाण; वाचा अहिल्यानगर क्राईम

spot_img

Ahilyanagar Crime: शहरातील भवानी नगर येथील एका बांधकाम व्यावसायिकाला तलवारीने जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केल्याची घटना घडली असून याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. फिर्यादी आशिष नामदेव लोखंडे (वय 45, रा. सार्थक भवानी नगर, मार्केट यार्ड) यांनी तक्रार दिली आहे. 10 सप्टेंबर रोजी सकाळी 9.54 वाजता त्यांचा शेजारी ढेल्या कदम्या चव्हाण त्यांच्या घरात शिरून शिवीगाळ करू लागला. विरोध केला असता तुला तलवारीने खल्लास करतो अशी धमकी दिली. त्यानंतर रस्त्यावर नेऊन, ढेल्याची आजी सिंधु पोपट चव्हाण आणि एक अज्ञात नातेवाईक यांनी याला संपवून टाक असे म्हणत शिवीगाळ केली आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. घटनेनंतर लोखंडे यांनी कोतवाली पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी ढेल्या चव्हाण, त्याची आजी सिंधु पोपट चव्हाण व अज्ञात नातेवाईकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहे.

पत्नीचे विवाहबाह्य संबंध; पतीची न्यालयात धाव
प्रियकरासह सासुरवाडी विरोधात गुन्हा दाखल
शहरात पुन्हा एकदा विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणाने खळबळ उडवली आहे. पत्नीच्या मानसिक छळासह खोट्या आरोपांना कंटाळून एका तरुणाने थेट न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार पत्नी, प्रियकर मुकुंद चंद्रकांत धांडे (रा. रेवकी, ता. गेवराई, जि. बिड) यांच्यासह सासरच्या मंडळींविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी पतीचे 24 डिसेंबर 2023 रोजी लग्न झाले. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच पत्नी सतत उदास राहू लागली आणि एकांतात रडत असे. 10 जानेवारी 2024 रोजी आजारी असल्याचे सांगत पत्नीने माहेर गाठले. त्यानंतर पुन्हा पतीने तिला 19 जानेवारी 2024 रोजी परत आणले, परंतु तिचे वागणे बदले नाही. याच दरम्यान, पत्नीच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर एक युवकाचा व्हिडीओ पाहून फिर्यादी पतीने चौकशी केली असता, तो युवक मुकुंद चंद्रकांत धांडे (रा. रेवकी, ता. गेवराई, जि. बीड) असल्याचे निष्पन्न झाले. मुकुंद धांडे याने यूट्यूबवर आक्षेपार्ह व्हिडीओ देखील अपलोड केले असल्याचा आरोप करण्यात आला आहे, ज्यामुळे पती-पत्नीमध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर ३० जानेवारी रोजी पत्नीने दागिन्यासह माहेर गाठले. त्यानंतर, भरोसा सेल बिड येथे खोटा आरोप करत फिर्यादी पती व कुटुंबीयांविरुद्ध दावा दाखल करत ४० लाख रुपयांची मागणी करत खोट्या गुन्ह्यांची धमकी दिली.अ सल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेता फिर्यादी पतीने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

गर्दीचा फायदा घेत दोन लाख लंपास; तारकपुर बसस्टँड परिसरातील घटना
तारकपुर बसस्टँड येथे बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने एका महिलेच्या बॅगेतून दोन लाख रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शारदा दामु उबाळे (वय ५५, रा. सुभाष टेकडी, उल्हासनगर, जि. ठाणे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शारदा उबाळे या घरकाम करून उदरनिर्वाह करतात, तर त्यांचे पती दामु धोंडीबा उबाळे हे सेवानिवृत्त आहेत. त्यांनी २०२२ मध्ये मोहोजदेवढे (ता. पाथर्डी) येथील शेती अप्पा गोयकर यांना विकली होती. या विक्रीपोटी मिळालेले दोन लाख रुपये दिनांक २ सप्टेंबर २०२५ रोजी बालमटाकळी (ता. शेवगाव) येथे अप्पा गोयकर यांनी उबाळे दाम्पत्याला रोख स्वरूपात दिले होते. यानंतर ४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता शारदा व त्यांचे पती उल्हासनगरला जाण्यासाठी तारकपुर बसस्टँडवर पोहोचले. तेव्हा बसमध्ये चढण्यासाठी प्रचंड गर्दी होती. बसमध्ये चढल्यानंतर शारदा यांनी आपली बॅग तपासली असता, त्यामध्ये ठेवलेले दोन लाख रुपये (५०० रुपयांच्या ४०० नोटा) गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.

घरफोडीतील ऐवज फिर्यादींना सुपूर्द; पोलिसांच्या कारवाईचे कौतुक
शहरातील दोन घरफोडी प्रकरणात चोरीस गेलेले सोन्याचे दागिने पोलिसांनी संबंधित फिर्यादींना सुपूर्द केले आहे. पोलिसांच्या या कारवाईचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.दोन्ही घरफोडी प्रकरणातील मुद्देमाल पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते फिर्यादी अंजली अडिवळे आणि केवळकुमार गांधी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि तपासी पथक उपस्थित होते. दि. १३ मार्च २०२५ रोजी येवलेनगर, सारसनगर येथील अंजली संतोष अडिवळे यांच्या घराचे कुलूप डुप्लिकेट चावीने उघडून ८३ ग्रॅम सोन्याचे दागिनेचोरीस गेले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध घेत चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला होता. तर दि. ३ जुलै २०२५ रोजी, गणेश कॉलनी, सारसनगर येथील केवळकुमार भगवानदास गांधी यांच्या बंद घराचे कुलूप तोडून १२० ग्रॅम सोन्याचे दागिनेलंपास केले गेले होते. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला होता.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरिष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर, पोसई गजेंद्र इंगळे, पोलीस अंमलदार संदीप घोडके, दीपक शिंदे, रवि टकले, रेखा पुंड, प्रमोद लहारे आणि विठ्ठल राठोड यांच्या पथकाने केली.

जमिनीच्या वादातून पुतण्यांची चुलत्याला मारहाण
देहरे (ता. अहिल्यानगर) येथे शेतजमिनीच्या वादातून पुतण्यांने चुलत्याला मारहाण करत धमकी दिल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी फिर्यादी चुलते रामदास यादव कल्हापुरे (वय ५८, रा. देहरे) यांनी तक्रार दिली. त्यानुसार पुतणे बाळासाहेब नारायण कल्हापुरे आणि गणेश नारायण कल्हापुरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. ७ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता ते आपल्या शेतामध्ये जात असताना वरील दोन्ही त्यांना अडवून शेतातून जाण्यास मज्जाव केला. रामदास यांनी ही माझीही शेती आहे, मी येथून जाणारच, असे सांगितल्यावर आरोपी संतापले. त्यांनी रामदास यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी गणेश याने लाकडी काठीने त्यांच्या डाव्या हाताच्या मनगटावर जोरदार वार केला. दरम्यान, हे बघून रामदास यांचा मुलगा महेश घटनास्थळी पोहोचला असता, त्यालाही दोघांनी शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच, पुन्हा शेतात आलात तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. या झटापटीत महेश यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी गहाळ झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला! दिल्ली, मुंबई आणि झारखंडमध्ये एकाचवेळी छापा; ५ दहशतवाद्यांना अटक

मुंबई । नगर सहयाद्री:- देशभरात पसरलेल्या दहशतवादी नेटवर्कवर मोठी कारवाई करत दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्ष...

लाडक्या बहिणींना आनंद वार्ता!, ऑगस्टचा हप्ता खात्यात खटाखट जमा

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट...

परतीच्या पावसाचा जोर वाढणार; २५ जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा, वाचा सविस्तर

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यात सध्या पावसाचा खंड जाणवत असून शेतकऱ्यांच्या नजरा आता परतीच्या...

अहिल्यानगर: बिंगो, जुगार, दारु विक्रेत्यावर छापा; एकाच दिवशी धडक कारवाई

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने छापेमारी करत...