spot_img
अहमदनगरजल्लोष करणे पडले अडीच लाखांना! मतमोजणी केंद्राबाहेर नेमकं घडलं काय?

जल्लोष करणे पडले अडीच लाखांना! मतमोजणी केंद्राबाहेर नेमकं घडलं काय?

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
एमआयडीसी परिसरातील लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी केंद्राबाहेर जल्लोष करणार्‍या आणखी काही कार्यकर्त्यांच्या गळ्यातील दोन लाख ४७ हजार रूपये किमतीच्या सोन्याच्या चार चेन (सुमारे १२ तोळे) चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत चोरल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात बुधवारी (५ जून) दुपारी आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.

एमआयडीसी परिसरातील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये मंगळवारी (४ जून) शिर्डी आणि अहमदनगर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी झाली. निवडणुकीचा निकाल ऐकण्यासाठी सायंकाळच्या सुमारास मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

या गर्दीत चोरट्यांनी अनेक कार्यकर्त्यांच्या खिशातील पाकिटे, अनेकांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन चोरल्या, त्यातील एका चोरट्याला काहींनी चोरी करताना रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. राजेंद्र वसंत शिंदे (रा. पाथर्डी) असे या चोरट्याचे नाव आहे. याबाबत सचिन मोहन शिंदे (रा. सप्रे मळा, बोल्हेगाव फाटा) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी वरून मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला होता.

त्यानंतर बुधवारी दुपारी स्वप्नील सुखलाल ठाणगे (रा. भारत बेकरी जवळ, बोल्हेगाव) यांनी फिर्याद दिली असून मंगळवारी रात्री ११.१५ ते ११.३० या दरम्यान मतमोजणी केंद्रा बाहेर अज्ञात चोरट्याने गळ्यातील दोन लाख ४७ हजार रूपये किमतीच्या सोन्याच्या चेन चोरल्या असल्याचे म्हटले आहे. या फिर्यादीवरूनही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक परदेशी करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कारागृहातून आरोपीने पाठवले साक्षीदाराला धमकीचे पत्र; वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील साई कॉलनी परिसरात साक्षीदाराला पत्राद्वारे धमकी दिल्याचा प्रकार घडला....

पुण्यात नात्यांमध्येच रक्तरंजित थरार; आयुषच्या हत्येची धक्कादायक माहिती उजेडात

पुणे / नगर सह्याद्री - पुणे शहरातील नाना पेठ परिसरामध्ये झालेल्या आयुष कोमकर हत्या प्रकरणातील...

शहरात साहित्योत्सव रंगणार; संमेलनाची तयारी पूर्ण, ११, १२ सप्टेंबरला भरगच्च कार्यक्रम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- पुणे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी उपनगर शाखा आयोजित राज्यस्तरीय युवा साहित्य...

शासन निर्णय मागे घेण्याची आवश्यकता नाही!; मंत्री विखे पाटील

मंत्री छगन भुजबळ यांची मागणी फेटाळली मुंबई । नगर सहयाद्री:- मराठा आरक्षणाच्या संदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीने...