spot_img
अहमदनगरअहिल्यानगरच्या राजकारणात ट्विस्ट! साहेबांनी डाव टाकला? AB फॉर्म दिला..

अहिल्यानगरच्या राजकारणात ट्विस्ट! साहेबांनी डाव टाकला? AB फॉर्म दिला..

spot_img

 Vidhan Sabha Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यातच भाजप, मनसेनंतर आता शिवसेनेची 45 पहिली यादी जाहीर झाली आहे. तर शरद पवार यांनी आपला डाव टाकण्यास सुरुवात केली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आतापर्यंत 50 जणांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील तीन उमेदवारांचा यामध्ये समावेश आहे.

दरम्यान, अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ मतदारसंघतील श्रीगोंदा मतदारसंघात पुन्हा एक ट्विस्ट समोर आला आहे. भाजपने जाहीर केलेल्या पहिल्याच यादीत विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांना तब्येतीच्या कारणास्तव उमेदवारी न देता त्यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली आहे.

पाचपुते यांना उमेदवारी जाहीर होताच अनुराधा नागवडे यांनी अजित पवार यांना धक्का देत थेट महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेत मशाल चिन्हावर उमेदवारी करण्याचा निर्णय अनुराधा नागवडे यांनी घेतला. शिवसेनेत पक्षप्रवेश होणार असून त्यांची उमेदवारी देखील अंतिम असल्याची माहिती समोर आली होती.

अनुराधा नागवडे या भाजपाच्या प्रतिभा पाचपुते यांच्यासमोर उमेदवारी करतील असे एकंदरीत चित्र देखील कालपर्यंत समोर होते. मात्र आता पुन्हा श्रीगोंदा मतदारसंघात एक ट्विस्ट समोर आला आहे. माजी आमदार राहुल जगताप यांनी काही दिवसापूर्वीच शक्तिप्रदर्शन करत ‘वस्तादा’ च्या मार्गदर्शनाखाली विधानसभा ‘फिक्स’, असा संदेश देखील दिला होता. कालच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून 50 जणांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले.

यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील चार उमेदवारांचा समावेश आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, कर्जत जामखेड मतदारसंघामधून रोहित पवार तर पारनेर मतदारसंघातून राणीताई लंके  यांचा समावेश असल्याचे सांगितलं जात आहे. तसेच राहुल जगताप यांनाही उमेदवारीच शब्द असल्याचे सांगितलं जात आहे.

श्रीगोंद्यात नागवडे यांना एबी फॉर्म

महाविकास आघाडीतील उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची अधिकृत उमेदवारी अनुराधा नागवडे यांना मिळाली. त्याच वेळी एबी फॉर्म सुध्दा घेतला. आता पाचपुते विरुद्ध नागवडे अशी लढत रंगणार असल्याचे दिसून येतेय.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेरमध्ये बिबट्या जेरबंद; भीतीच्या सावटाखाली ग्रामस्थ

पारनेरमध्ये बिबट्या जेरबंद; भीतीच्या सावटाखाली ग्रामस्थ शेतकऱ्याची शेळी खाल्ल्यानंतर वन विभागाची मोहीम यशस्वी सुपा / नगर...

वनविभागाच्या निष्क्रियता: पारनेर तालुक्यात बिबट्यांचा वाढता उपद्रव; कळस येथील घटनेने खडकवाडी येथील घटनेची आठवण!

गणेश जगदाळे | नगर सह्याद्री पारनेर तालुक्याच्या उत्तर भागात मुळा नदीचा पट्टा व मुळा धरण...

आरास अन्‌‍… गर्दीच गर्दी…; बाप्पाच्या विसर्जनासाठी गणेशभक्त सज्ज, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‌‘डीजे‌’चा दणदणाट

अहिल्यानगर | नगर सह्याद्री दरवर्षी प्रमाणे यंदाही लाडक्या गणरायाचे भव्य स्वागत डीजेच्या दणक्यात गणेश भक्तांनी...

झेडपीला महायुती विरुद्ध महाविकास आघाडीच!

नगर तालुका पंचायत समितीसाठी आमदार शिवाजी कर्डिले विरुद्ध खा. नीलेश लंके, प्रा. शशिकांत गाडे...