TVS Orbiter: २९ ऑगस्ट २०२५: देशातील अग्रगण्य दुचाकी निर्माता TVS मोटर कंपनीने आपली तिसरी आणि अत्याधुनिक इलेक्ट्रिक स्कूटर ‘TVS Orbiter’ भारतीय बाजारात लाँच केली आहे. आकर्षक डिझाईन, प्रगत वैशिष्ट्यं आणि दमदार परफॉर्मन्ससह ही स्कूटर अनेक ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे.
शक्तीशाली बॅटरी आणि दमदार रेंज
TVS Orbiter मध्ये 3.1kWh लिथियम-आयन बॅटरी आणि 2.1kW हब-माउंटेड मोटर देण्यात आली आहे. IP67 रेटिंगसह ही स्कूटर एका चार्जवर तब्बल 158 किमी रेंज देते, तर टॉप स्पीड 68 किमी/तास आहे. 0 ते 40 किमी/तास वेग पकडण्यासाठी केवळ 6.8 सेकंद लागतात.
आकर्षक रंगसंगती आणि डिझाईन
TVS Orbiter ही स्कूटर निऑन सनबर्स्ट, स्ट्रॅटस ब्लू, लूनर ग्रे, मार्टियन कॉपर, कॉस्मिक टायटॅनियम आणि स्टेलर सिल्व्हर अशा सात आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे. आधुनिक LED हेडलाइट, डीआरएल, लांब व्हिजर, सपाट सीट आणि बॉक्सी डिझाइनमुळे ही स्कूटर रस्त्यावर उठून दिसते. स्मार्ट फीचर्सची भरभराट
स्कूटरमध्ये दिला गेलेला ५.५ इंचांचा रंगीत LCD डिस्प्ले स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, कॉल/एसएमएस अलर्ट, व टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनसारखी फीचर्स देतो. यासोबतच:
क्रूझ कंट्रोल
रिव्हर्स मोड
रिजनरेटिव्ह ब्रेकिंग
हिल होल्ड असिस्ट
जिओ-फेन्सिंग, टो अलर्ट, क्रॅश/फॉल अलर्ट
यूएसबी चार्जिंग पोर्ट
यांसारखी प्रगत सुविधा TVS Orbiter मध्ये उपलब्ध आहेत.
स्टोरेज आणि गॅरंटी
Orbiter मध्ये ३४ लिटर अंडरसीट स्टोरेज असून दोन हाफ-फेस हेल्मेट सहज बसू शकतात. समोरील स्टोरेज कंपार्टमेंट व २९० मिमी लांबीचा फूटबोर्ड हीही मोठी जमेची बाजू आहे. कंपनी ३ वर्षे किंवा ५०,००० किमीपर्यंत वॉरंटी देत आहे.
किंमत किती?
ही आधुनिक आणि स्टायलिश इलेक्ट्रिक स्कूटर केवळ ₹९९,९९० (एक्स-शोरूम) या आकर्षक किमतीत उपलब्ध आहे. ही किंमत पाहता TVS Orbiter भारतीय बाजारात इतर स्कूटर्ससाठी मोठं आव्हान ठरू शकते.