पुणे / नगर सह्याद्री –
राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार कधी होणार याविषयी मोठ्या प्रमाणात चर्चा करण्यात येत होत्या. अखेर काही दिवसांनंतर मंत्रीमंडळाचा विस्तार झाला, नंतर खातेवाटपही जाहीर झाले. मंत्र्यांनी आपापल्या खात्याचा पदभारही स्विकारला. बैठकांचा धडका लावून विभागातील अधिकाऱ्यांना गुणवत्तापूर्ण कामे करून नियोजन करण्याच्या सूचना देखील दिल्या. असे असले तरी गेल्या काही दिवसांतील राजकीय वातावरण पाहता महायुतीत पालकमंत्री पदावरून मोठी रस्सीखेच झाली असल्याची माहिती मिळत आहे.
मंत्रीमंडळ विस्तारात सर्वाधिक मंत्रीपद ही सातारा जिल्ह्याला मिळाली. सातारा जिल्ह्यातून शिवेंद्रराजे भोसले, शंभुराज देसाई, जयकुमार गोरे आणि मकरंद पाटील हे मंत्री झाले. मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्रातील पालकमंत्री पदावर भाजपचा वरचष्मा असल्याचे दिसून येते. तर राज्यातील ६ जिल्ह्यांच्या पालक मंत्री पदावरून अद्यापही मोठी रस्सीखेच होत असल्याची माहिती मिळत आहे. मुंबई उपनगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक, रायगड आणि अकोला या जिल्ह्यांच्या पालक मंत्री पदावरून मोठे राजकीय घमासाना होताना दिसत आहे. यामुळे या जिल्ह्यांच्या पालक कोण असणार हे लवकरच समजेल.
ही आहेत संभाव्य पालमंत्र्याची नाव
गडचिरोली – देवेंद्र फडणवीस
नागपूर – चंद्रशेखर बावनकुळे
सातारा – शिवेंद्रराजे भोसले
अहमदनगर – राधाकृष्ण विखे पाटील
अमरावती – चंद्रकांत पाटील
अकोला – आकाश फुंडकर
धुळे – जयकुमार रावल
लातूर – गिरीष महाजन
मुंबई उपनगर – मंगलप्रभात लोढा/ आशिष शेलार
नंदुरबार – अशोक वुईके
पालघर – गणेश नाईक
सिंधुदुर्ग- नितेश राणे
सोलापूर – जयकुमार गोरे
वर्धा – पंकज भोयर
ठाणे – एकनाथ शिंदे
छत्रपती संभाजी नगर – संजय शिरसाठ / अतुल सावे
जळगाव – गुलाबराव पाटील / भाजपाचा देखील दावा आहे
यवतमाळ – संजय राठोड
हिंगोली – आशिष जैस्वाल
मुंबई शहर – प्रताप सरनाईक
नाशिक – दादा भुसे / गिरीश महाजन यांचा देखील दावा
रायगड – भरत गोगावले / आदिती तटकरे यांचाही दावा कायम
रत्नागिरी – उदय सामंत
पुणे – अजित पवार
बीड – अजित पवार
कोल्हापूर – हसन मुश्रीफ
अकोला – माणिकराव कोकाटे/ आकाश फुंडकर यांचाही दावा आहे.
भंडारा – मकरंद पाटील
चंद्रपूर – नरहरी झिरवळ