spot_img
ब्रेकिंगसकाळपासून रडारड? 'ते' सत्य झोंबल शिल्लक मंडळाला; रुपाली चाकणकर यांचा विरोधकांवर हल्लाबोल

सकाळपासून रडारड? ‘ते’ सत्य झोंबल शिल्लक मंडळाला; रुपाली चाकणकर यांचा विरोधकांवर हल्लाबोल

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री-
आगामी लोकसभा निवडणुक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. लोकसभेपाठोपाठ राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजणार आहे. सर्वच पक्षाकडून जयत तयारी सुरु आहे. त्यातच निवडणुकीच्या पाश्वभुमीवर आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. दरम्यान अजित पवार गटाच्या रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत शरद पवार गटावर निशाणा साधला आहे.

अजित पवार यांच्यावर जितेंद्र आव्हाड यांनी टिकास्र सोडले आहे. अजित पवार खासदार असताना दिल्लीत जेव्हा त्यांची भाषण करायची वेळ यायची तेव्हा ते बाथरूममध्ये जाऊन बसायचे, अशी खोचक टीका आव्हाड यांनी केली होती. त्यातच रोहित पवार यांनीही अजित पवार यांच्यावर निशाणा साधत आज इंग्रज असते तर ते सत्तेसाठी इंग्रजांबरोबर देखील गेले असते, अशा शब्दांत हल्लाबोल केला.

अजित पवार यांच्या गटांकडून आरोपांना प्रतिउत्तर देण्यात आले.आव्हाड यांच्यात हिंमत असेल तर समोर येऊन खुल्या मंचावर चर्चा करावी. घाऱ्या डोळ्यांचा तथाकथित पुरोगामी असलेल्या जितेंद्र आव्हाडला महाराष्ट्र उत्तर देण्यास खंबीर आहे, असे आवाहनच अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी केले असून सेल्फी काढून विकास होत नसतो. दादांनी सकाळी सांगितलेलं हे सत्य झोंबल असेल शिल्लक मित्र मंडळाला? सकाळपासूनची रडारड पाहता मानसिकतेचा तोल ढासळलेला दिसतोय अशा शब्दात ट्विट करत रुपाली चाकणकर यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

नेमकं ट्विट काय?
सेल्फी काढून विकास होत नसतो अन फक्त संसदेत भाषण करून लोकांची काम होत नसतात.. दादांनी सकाळी सांगितलेलं हे सत्य एवढं का झोंबल असेल बर शिल्लक मित्र मंडळाला? सकाळपासून सुरू असलेली रडारड पाहता काळजीवाहूंनी कामच केलं नसल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या मानसिकतेचा तोल अधिक ढासळू लागलेला दिसतोय.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...